मोहन भागवत यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप सोहळा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2018 09:44 PM IST

मोहन भागवत यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे

नागपूर, 07 जून : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप सोहळा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला. संघप्रथेप्रमाणे प्रमुख अतिथीचं भाषण आधी होत असते पण यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणवदांच्या आधी भाषण केलं. जाणून घेऊयात त्यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे

मोहन भागवत यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे

- भारतात जन्मला आलेला प्रत्येक पुत्र भारत मातेचा आहे.

- सरकार खूप काही करू शकतं पण सरकार सगळं काही करू शकत नाही.

- हेडगेवार काँग्रेसच्या आंदोलनात दोन वेळा तुरुंगात गेले होते, समाजसुधारणेच्या कामातही त्यांचं योगदान

Loading...

- सबकी माता भारत माता

- सगळ्यांचे पूर्वज सारखे आहेत.

- सगळ्यांच्या जीवनावर भारतीय संस्कृतिचा प्रभाव पाहायला मिळतो

- शक्तीला शिलाची जोड नसल्यास ती दानवी ठरते. त्यामुळे शक्तीला शिलाची जोड असणं आवश्यक आहे.

- कुठलेही काम हे शक्ती शिवाय होत नाही आणि शक्ती संघटनातून येते आणि शक्तीला जर शिल नसेल तर त्याला दानवी स्वरुप प्राप्त होते

- समाजामध्ये संघाला संघटन करायचं नाहीये तर समाजाचं संघटन करायचं आहे

- शक्ती संघटनेत असते. सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्यात असते आणि शक्तीला जर शील जोडलं गेलं ( चारित्र्य ) तर त्याला अधिक शक्ती प्राप्त होते

- आम्ही जसे आहोत तसेच दिसतो आणि तसंच काम करतोय

- संघाच्या कामाला प्रत्यक्ष बघा, ते खरं आहे का नाही ते येऊन पहा

- चांगलं वाटलं तर आपलं स्वागतच आहे. नाही पटलं तर जाण्याची सगळ्यांना मोकळीक आहे

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2018 09:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...