'जलयुक्त शिवार अभियान' तात्काळ रद्द करा, प्रा.देसरडांची मागणी

'जलयुक्त शिवार अभियान' तात्काळ रद्द करा, प्रा.देसरडांची मागणी

फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार कार्यक्रमाचा अध्यादेश तात्काळ रद्द करावा अशी मागणी अर्थतज्ज्ञ प्रा.देसरडा यांनी केलीय.

  • Share this:

14 सप्टेंबर : फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार कार्यक्रमाचा अध्यादेश तात्काळ रद्द करावा अशी मागणी अर्थतज्ज्ञ प्रा.देसरडा यांनी केलीय.

जलयुक्त शिवारमुळे लघु पाणलोट क्षेत्राच्या नैसर्गिक बाबींना धक्का पोहोचत आहे. नद्या, ओढे रुंदीकरण-खोलीकरण -विस्तारीकरण जो सपाटा लावला आहे ते काम बंद करावे अशी मागणी देसरडा यांनी केलीय.

देसरडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर राज्य सरकारने माजी मुख सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीलाही देसरडा यांनी पुराव्यानिशी अनेक बाबाजी सांगितल्या असून जलयुक्त शिवार बंदची मागणी केलीये.

राज्य सरकारने ३ वर्षात जलयुक्त शिवाराची साडेअकरा हजार गावात ४ लाख कामे केली असून ,२४ टीएमसी पाणीसाठा केला जात आहे या आकडेवारींना काय आधार आहे असा सवालही देसरडा यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2017 10:04 PM IST

ताज्या बातम्या