काळजी घ्या, पुढल्या दोन दिवसात राज्यात उसळणार उष्णेतेची लाट

मुंबई, 21 एप्रिल : येत्या 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणचं कमाल तापमान उच्चांकी जाणार असून उष्णतेची लाट उसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 10:44 PM IST

काळजी घ्या, पुढल्या दोन दिवसात राज्यात उसळणार उष्णेतेची लाट

मुंबई, 21 एप्रिल : येत्या 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणचं कमाल तापमान उच्चांकी जाणार असून उष्णतेची लाट उसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

उत्तरेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक ठिकाणचं कमाल तापमान 40 अंशाच्यावर पोहोचलं आहे. गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने संपूर्ण राज्याला झोडपून काढलं होतं. तर अनेक ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे तापमानात चढ-उतार सुरू होती. पण तो गारवा फार काळ टिकला नाही.

रविवार 21 एप्रिल रोजी राज्यात सर्वात जास्त तापमान परभणी येथे नोंदवलं गेलं. परभणीचा पारा हा 42.1 अशावर पोहोचला होता. तर जळगाव, मालेगाव, सोलापूर, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रम्हपूरी, चंद्रपूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळचा पारा 40 अंशावर गेला होता. तर राज्यातील उर्वरीत भागाचं तापमान हे 33 अंशाच्यावरच स्थिरावलं होतं.

राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढलेला असून, बदलत्या हवामानानुसार येत्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान 43 अंशाच्यावर जाण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. नागरिकांनी स्वतःची विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.


Loading...

मुंबईकरांनाही उष्णतेचा फटका

वाढत्या उष्णतेचा फटका मुंबईकरांनाही बसत आहे. रविवारी कुलाबा येथे 33.8, तर सांताक्रूझ येथे 33.1 कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईच्या उपनगरांचाही पारा रविवारी वाढलेलाच होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2019 10:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...