S M L

येत्या 24 तासात मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई, 15 एप्रिल : महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, येत्या 24 तासात मुंबईसह राज्यात जोरदार पावसाची शक्याता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

Updated On: Apr 15, 2019 05:25 PM IST

येत्या 24 तासात मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई, 15 एप्रिल : महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, येत्या दोन दिवसात मुंबईसह राज्यात जोरदार पावसाची शक्याता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही ठिकाणी चांगला गारवा अनुभवायला मिळत असला तरी शेतकऱ्यांचं मात्र अवेळी झालेल्या या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यात आता पुढील दोन दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कर्नाटकाच्या किनारपट्टीवर झालेल्या हवामानामुळे वातावरणात बदल झाले असून पुढील दोन दिवस पाऊस होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

हवामानात बदल झाल्यामुळे तापमानात दोन डिग्री सेल्सिअसपर्यंत घट होवू शकते. मात्र, उकाडा कायम राहिल असंही हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.


पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरण, जोरदार अवकाळी पाऊस, गारा पडणे अशा घटना घडत आहेत. १३ आणि १४ एप्रिल रोजी अंबरनाथ, नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, नाशिकमधील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली. अवेळी झालेल्या या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. चिकू, आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. हवामान खात्यानं येत्या दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असल्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडीशी आलेला घास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



Loading...

'स्कायमेट'नंही वर्तवला अंदाज...

- दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात पावासाचा अंदाज

- उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसांच्या सरी.

- ढगांच्या गडगडाट, वादळी वाऱ्यासह मराठवाडा, विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज.

- 16 आणि 17 एप्रिल रोजी अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.



मान्सून हूल देणार की वेळेत येणार?


काही दिवसांपूर्वी स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात मान्सून सरासरीच्या 93 टक्के पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतातील मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव असेल असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवला होता. मात्र, हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचं म्हटलं होतं. मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असंही सांगण्यात आलं होतं. हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या अंदाजानुसार, 'अल निनोचा प्रभाव कमी असेल त्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात दिलासा मिळू शकतो.' यंदा सरासरीच्या 95 ते 104 टक्के सामान्यत: मान्सून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



मान्सून चांगला झाला तर त्याचा परिणाम कोणत्या गोष्टींवर होणार?


1.आर्थिक विकास चांगला होईल


2.शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.


3.अनेक ग्रामीण भागांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.


4.चांगला पाऊस झाला तर उत्पादन चांगलं येईल आणि शेतकऱ्यांना, छोट्या व्यापाऱ्यांना फायदा होईल.


5. महामाई कमी होण्याची शक्यता


6. शेअर बाजारावर होऊ शकतो परिणाम


7. पाऊस चांगला झाला तर त्याचा फायदा बँक आणि फायनान्शियल सेक्टरलाही होणार आहे.


8.शेतकऱ्यांना आवश्यक ती उपकरण, वस्तू, खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.


त्यामुळे स्कायमेट आणि आयएमडी या दोन्हीचे अंदाज अगदी वेगवेगळे आहेत. दरम्यान, उन्हाचे आणि पाणी टंचाईचे चटके बसलेला शेतकरी आणि जनता पावसाची आतूरतेनं वाट पाहत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 05:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close