सासू-सुनेवर बलात्कार करणाऱ्या भोंदू बाबाला अटक

पुण्यात दैवी ताकद असल्याचं भासवून उपचार करणाऱ्या भोंदू बाबाला खडक पोलिसांनी अटक केलीये.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 6, 2017 08:11 PM IST

सासू-सुनेवर बलात्कार करणाऱ्या भोंदू बाबाला अटक

06 डिसेंबर : पुण्यात दैवी ताकद असल्याचं भासवून उपचार करणाऱ्या भोंदू बाबाला खडक पोलिसांनी अटक केलीये. धक्कदायक म्हणजे या भोंदूने साताऱ्यातील एकाच कुटुंबातील सासू सुनेला विश्वासात घेऊन त्यांच्यावर दैवी उपचार करण्याच्या बहाण्याने घरी येऊन अनेकदा बलात्कार केल्याचं समोर आलाय.

हा आहे इमाम हैदर अली शेख. या हैदर अलीनं एक कुटुंबच उद्धवस्त केलंय. अध्यात्मिक शक्ती असल्याचं सांगत या भोंदूबाबानं सासू आणि सुनेचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तो एवढ्यावरच थांबला नाही तर व्यवसाय भरभराटीस आणून देतो असं सांगून त्यानं लाखो रुपये आणि महागड्या कारही पीडित कुटुंबाकडून उकळल्या.

सासू सुनांना वासनेची शिकार बनवल्यानंतर या वासनांधाची नजर घरातल्या लहान मुलीवरही पडली. हे सगळं असह्य झाल्यानं पीडित महिलेनं झाला प्रकार नवऱ्याला सांगितला. त्यांनी खडक पोलिसात धाव घेतली. खडक पोलिसांनी हैदरअलीला अटक केलीय.

लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन बाबाबुवा लोकांना लुटत होते, फसवत होते. पण उच्चशिक्षित लोकंही भोंदूबाबांच्या आहारी जाऊन उद्धवस्त  होत असल्याचं या प्रकरणाच्या निमित्तानं समोर आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 08:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...