News18 Lokmat

एसटी बसमधून मोठा मद्यसाठा जप्त, चोरवड चेकपोस्टवर कारवाई

वडणुकीच्या अनुषंगाने बस व वाहनांची तपासणी पोलीस कॉन्स्टेबल मोसोरोद्दिन व नवाज तडवी यांना बऱ्हाणपूर-धुळे बसमध्ये (एम.एच.४०,एन ९०३९) मद्यसाठा जप्त करण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 04:49 PM IST

एसटी बसमधून मोठा मद्यसाठा जप्त, चोरवड चेकपोस्टवर कारवाई

इम्तियाज अहमद (प्रतिनिधी)

भुसावळ,२२ एप्रिल- मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूरहून भुसावळला येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून मोठा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.  चोरवड येथील तपासणी नाक्यावर सोमवारी सकाळी पोलिसांनी ही कारवाई करत एकाच्या मुसक्या आवळल्या.

मिळालेली माहिती अशी की, उद्या (२३ एप्रिल) लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. यात रावेर आणि जळगाव मतदानसंघाचा समावेश आहे. काल (रविवारी) प्रचारतोफा थंडावल्या. या पार्श्वभूमीवर पैसा, मद्य , शस्त्रे यांची वाहतूक होवू नये, यासाठी वाहनांची प्रशासन कसुन तपासणी करत आहे. सोमवारी सकाळी चोरवड येथील तपासणी नाक्यावर एसटी बसमधून भुसावळला अवैध मद्य नेणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. रावेर पोलीस हद्दीला लागून मध्यप्रदेशाची हद्द येते, इकडून मोठ्या प्रमाणात गुटखा, गोमांस व अवैध शस्त्रांची वाहतूक केली जाते. निवडणुकीच्या अनुषंगाने बस व वाहनांची तपासणी पोलीस कॉन्स्टेबल मोसोरोद्दिन व नवाज तडवी यांना बऱ्हाणपूर-धुळे बसमध्ये (एम.एच.४०,एन ९०३९) मद्यसाठा जप्त करण्यात आला. राहुल पटेल (२४, रा.इतवारागेट, बऱ्हाणपूर) या  तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने सीटखाली दोन काळ्या व एक राखाड्या  रंगाच्या बॅगेत मद्यसाठा ठेवला होता.  या प्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दखल करण्यात आला आहे.Loading...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...