News18 Lokmat

माझ्या टेबलावर फाईल असती,तर मीच आरक्षण दिलं असतं -पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांनी आज परळीत जाऊन या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2018 10:05 PM IST

माझ्या टेबलावर फाईल असती,तर मीच आरक्षण दिलं असतं -पंकजा मुंडे

 बीड, 26 जुलै : मराठा समाजाला आरक्षण देण्याची फाईल माझ्या टेबलवर असती तर ती कधीच निकाली काढली असती असं वक्तव्य महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय. तसंच आता या मोर्चेकऱ्यांची दूत म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं. विशेष म्हणजे एकीकडे मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याची चर्चा सुरू झालीय.

मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा

पंकजा मुंडे यांनी आज परळीत जाऊन या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. पण तुम्ही शांततेनं आंदोलन करा, कायदा हातात घेऊ नका, तुमचा जीव महत्त्वाचा आहे. शिवरायांची शपथ घेऊन सांगते, जर मराठा आरक्षण देण्याची फाईल माझ्या टेबलवर असती तर ती कधीच निकाली काढली असती असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्यात. मी इथं तुमची दूत म्हणून आली आहे, तुमच्यासाठी मी मुख्यमंत्री ते पंतप्रधानांपर्यंत मराठा आरक्षणासाठी जाणार आहे असं आश्वासनही मुंडे यांनी दिलं.

याआधीही पंकजा मुंडे यांनी मराठा तरुणांना आत्महत्या करून नका, तुमचा जीव महत्त्वाचा आहे असं भावनिक आवाहनही पंकजा मुंडेंनी केलं होतं.

परळीत मराठा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Loading...

शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांना उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री जवळचे - रवी राणा

मराठा ठोक मोर्चाच्या वतीने परळीत आंदोलन सुरू आहे.  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रशांत सवराते असं या तरुणाचं नाव आहे. मराठा समाजाच्या मागण्या व्हाव्या यासाठी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाह. घटनेनंतर प्रशांत यांना तात्काळ नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

आणखी एका आमदाराचा राजीनामा

VIDEO : सांगलीनंतर सोलापूरमध्येही जाळली एसटी बस

दरम्यान,मराठा आरक्षणासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आमदारांच्या पाठोपाठ आता काँग्रेसच्या आमदारानेही राजीनामा दिला आहे. पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. भालके यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षाकडे पाठवला आहे. आतापर्यंत एकूण तीन आमदारांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर बैठक बोलावलीये. यात राज्यातले सर्व मंत्री सहभागी होणार आहेत त्याचबरोबर मराठा आमदारही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...