S M L

भाजपसाठी तन-मन-धन दिलं, तरी विचार का होत नाही - संजय काकडे

'जर काँग्रेसने सन्मानाने तिकीट दिलं तर पुण्यातून लोकसभा लढणार', असं काकडे यांनी म्हटलं आहे

News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2019 06:38 PM IST

भाजपसाठी तन-मन-धन दिलं, तरी विचार का होत नाही - संजय काकडे


अद्धैत मेहता, प्रतिनिधी

पुणे, 30 जानेवारी : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल वक्तव्य केलं आहे. 'जर काँग्रेसने सन्मानाने तिकीट दिलं तर पुण्यातून लोकसभा लढणार', असं काकडे यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपसाठी मी तन- मन-धन दिलं तरी, माझा विचार का होत नाही' अशी खंतही त्यांनी बोलावून दाखवली.


न्यूज18 लोकमतशी बोलताना संजय काकडे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून आपण लायक उमेदवार असल्याचं सांगितलं आहे. 'पुणे महापालिका निवडणुकीचे गिरीश बापट हे मुळीच शिल्पकार नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बापट विरुद्ध काकडे हा सामना खरंच व्हावा यासाठी मी उत्सुक आहे', असंही काकडे म्हणाले.

'भाजप पक्षासाठी तन-मन-धन दिलं, तरी माझा विचार का होत नाही याचं दुःख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझा सन्मान राखतील', अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

अलीकडेच संजय काकडे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. या भेटीबद्दल विचारले असता, काकडे म्हणाले की, 'मी छगन भुजबळ यांना भेटलो होता. कारण , पुण्यात मला ओबीसी समाजाची गरज आहे. मात्र मी शरद पवार,अशोक चव्हाण यांना राजकीय हेतूने भेटलो नाही.'

Loading...

'मी दुखी आहे, दुःखी माणूस जसा वेगवेगळ्या वाटा शोधतो तशा मी शोधल्या तर त्यात गैर काय आहे. मला जर भाजप किंवा काँग्रेसने तिकीट दिलं नाही तरी 2020पर्यंत राज्यसभेवर आहेच आणि पुढेही राहीन', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी संजय काकडे यांनी थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरच निशाणा साधला होता. 'भाजप शिवसेना युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे हे दीड लाख मतांनी पराभूत होतील', असा दावाच काकडेंनी केला होता. 'दानवे यांच्या मतदारसंघाचा मी सर्व्हे केला आहे. माझा सर्व्हे कधी चुकत नाही', असंही काकडे म्हणाले होते. एवढंच नाहीतर माझा सर्व्हे चुकला तर मी राजकीय संन्यास घेईन, असंही काकडेंनी जाहीर करून टाकलं होतं.

====================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2019 06:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close