गडचिरोलीत माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेत हे पोलीस कॉन्स्टेबल

गडचिरोलीत माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेत हे पोलीस कॉन्स्टेबल

संपूर्ण महाराष्ट्रात 'महाराष्ट्र दिन' साजरा होत असताना गडचिरोलीत माओवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला घडवून आणला आहे. यात 15 पोलीस शहीद झाले तसेच गाडी चालकाचाही मृत्यू झाला आहे.

  • Share this:

गडचिरोली, 1 मे- संपूर्ण महाराष्ट्रात 'महाराष्ट्र दिन' साजरा होत असताना गडचिरोलीत माओवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला घडवून आणला आहे. यात 15 पोलीस शहीद झाले तसेच गाडी चालकाचाही मृत्यू झाला आहे. माओवाद्यांनी मार्गावर आयईडी स्फोटके पेरुन ठेवले होती. जांभूरपाडा गावाजवळ हा हल्ला झाला आहे. शहीद पोलीस गडचिरोली जिल्ह्याती रहिवासी आहेत.

हे पोलीस कॉन्स्टेबल झाले शहीद...

दयानंद सहारे, अग्रमन रहाते, सर्जेराव खाडे, किशोर बोबटे, संतोष चव्हाण, राजू गायकवाड, लक्ष्मण कोडप, साहुदास माडवी, नितिन घोरमारे, पुर्णा शाहदुग्गा, प्रमोद भोयर, तौफिक शेख, अमृत भदाडे, योगेश हलामी, भुपेश वोलाटे, सोमेश्वर सिंहनाथ (खासगी चालक, रा.कुरखेडा)

या ठिकाणी झाला हल्ला...

कुरखेडा तालुक्यात जांभूरपाडा गावाजवळ हा हल्ला झाला आहे. अॅब्युलन्स घटनास्थळी पोहोचल्या असून शहीद पोलिसांचे पार्थिव पोलीस मुख्यालयात आणले जाणार आहेत. या हल्ल्यात 15 पोलीस शहीद झाल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'नेटवर्क 18 लोकमत'शी संवाद साधताना दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचे सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

या हल्ल्यापूर्वी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दानापूरमध्ये माओवाद्यांनी तब्बल 30 वाहने जाळली होती. या घटनेत 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त अधिक मालमत्तेचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. माओवाद्यांनी मंगळवारी (30 एप्रिल)रात्री 11 ते 3 वाजेच्या सुमारास हे जळीतकांड घडवून आणले आहे.

पुराडा पोलीस स्थानकाअंतर्गत येत असलेल्या दादापूर येथून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होते. या कामावरील ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर यासह 30 पेक्षा जास्त वाहने जाळण्यात आली आहेत. तसेच दादापूर येथील डांबर प्लांट,राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यालयही माओवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आले. माओवाद्यांनी केलेल्या या कृत्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, याआधीही माओवाद्यांनी रस्ते तयार करणाऱ्या वाहनांना लक्ष्य केल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आगामी काळात अशी विकासकामे करताना माओवाद्यांकडून होणाऱ्या हिंसक प्रकारांना कसे रोखायचे, हे आव्हान प्रशासनासमोर आहे.


VIDEO : गडचिरोलीत जिथे स्फोट घडला 'त्या' परिसरात पोहोचला न्यूज18 लोकमतचा प्रतिनिधी, संपूर्ण आढावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 06:16 PM IST

ताज्या बातम्या