S M L

IBNलोकमत इम्पॅक्ट : अवघ्या तीन तासात रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात

कणकवलीमध्ये मुंबई गोवा हायवेवर दुरुस्तीला सुरुवात झालीय. आयबीएन लोकमतनं आज सकाळी बातमी दाखवली, आणि साडे अकरा वाजल्यापासून डागडुजीच्या कामाला सुरुवात झालीय.

Sonali Deshpande | Updated On: Oct 26, 2017 03:00 PM IST

IBNलोकमत इम्पॅक्ट : अवघ्या तीन तासात रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात

दिनेश केळुसकर, कणकवली,26 आॅक्टोबर : कणकवलीमध्ये मुंबई गोवा हायवेवर दुरुस्तीला सुरुवात झालीय. आयबीएन लोकमतनं आज सकाळी बातमी दाखवली, आणि साडे अकरा वाजल्यापासून डागडुजीच्या कामाला सुरुवात झालीय. पावसाळ्यापासून आम्ही ही बातमी दाखवत होतो. मध्यंतरी थोडी दुरुस्ती केली, पण परतीच्या पावसानं पुन्हा खड्डे पडले. म्हणजेच खड्ड्यांच्या डागडुजीचं काम किती निकृष्ट दर्जाचं असतं, हे यावरून दिसतंय.

सिंधुदुर्ग मुंबई गोवा महामार्गावरचा कणकवली ते झारापपर्यंतचा भाग अजूनही खड्ड्यानी भरलेला आहे. खड्डे वाचवण्यासाठी वाहन चालक कशीही गाडी चालवतात, आणि अपघात होतात. त्यात प्रवाशांचा नाहक बळी जातो. पाऊस संपला, ऑक्टोबर महिना संपत आला तरी खड्डे तसेच आहेत. पण प्रशासन मात्र ढिम्म आहे. सर्वांना मणक्याचे आजार झाल्यावर सरकारला जाग येणार आहे का, असा सवाल प्रवासी करतायेत. सरकारला लाज उरली नाहीय, असं म्हणण्याइतपत लोकांचा संताप झालाय.

मुंबई गोवा हायवे हा देशातल्या अतिमहत्वाच्या हायवेपैकी एक आहे. कारण फक्त मुंबई किंवा तळकोकणातले लोक नाही, तर राजस्थान, गुजरात, कर्नाटक, केरळ या राज्यातले नागरिक आणि ट्रक हा हायवे वापरतात. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या महत्त्वाच्या हायवेजपैकी हा एक.पण तरीही हायवेची दुर्दशा तशीच आहे. पण IBNलोकमतच्या बातमीमुळे या हायवेच्या दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2017 02:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close