S M L

...तसं तर मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे -एकनाथ खडसे

जळगाव महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर खडसे यांनी मनातील खदखद मोकळी केली

Updated On: Aug 4, 2018 06:49 PM IST

...तसं तर मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे -एकनाथ खडसे

जळगाव, 04 आॅगस्ट :   पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली. शहरातील आयएमए हॉलमध्ये इइएसएल आणि चार पालिकांशी एलईडी पथदिव्यांसाठी झालेल्या करारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जळगाव पालिका निवडणुकीत खडसे आणि महाजन गटामध्ये चुरस असल्याचं दाखविलं जातं. आमच्यात असे कोणतेही गट-तट नाही आणि असले तर त्या सर्वांचा मीच नेता आहे असं खडसेंनी स्पष्टपणे सांगितलं. जळगाव महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर खडसे यांनी मनातील खदखद मोकळी केली आणि पक्षाला राज्यापासून जळगावला सत्तेत आणण्यासाठी आपले योगदान असून शिवसेना- भाजप युती आपणच तोडल्याचा त्यांनी पुर्नउच्चार केला.

जळगाव महापालिका निकालाबाबत ते म्हणाले, मी चाळीस वर्षांपासून भाजपचे काम करीत आहे. त्यातील तीस वर्षे जळगावला भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष केला. स्वत:ला श्रेय मिळावे म्हणून कधी लढा दिला नाही. अन्याय, भ्रष्टाचारावर प्रहार केले. कुणीतरी श्रेय घेण्यापेक्षा जनतेला सर्व काही माहित आहे. नाथाभाऊंबद्दल जनतेच्या मनात इतका आदर आहे की श्रेय दिलं काय आणि नाही दिले काय काही एक फरक पडत नाही. ज्याला श्रेय मिळत नाही त्यांना श्रेय द्या. जळगाव महापालिकेतील भाजपचा विजय हा सर्वांचा विजय आहे याचे श्रेय घेणाऱ्यांना शुभेच्छा असंही खडसेंनी म्हटलं.

खडसे म्हणाले, जिल्ह्यात वर्षानुवर्षांपासून मीच कार्यकर्ते घडवले आणि मोठे केले. त्यांना संधी दिली. माझ्या मनात श्रेयवादाची भावना कधी निर्माण झाली नाही आणि होणार नाही. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी युती केली असती तर निकालानंतर हा युतीचा विजय आहे असं म्हटलं असते. मीच पक्षाला एकटे लढवण्यासाठी भाग पाडले आणि त्यामुळे भाजपचा विजय झाला. निवडणुकीत उभे असलेले सर्वच्या सर्व 75 उमेदवार नाथाभाऊंचे आहे असंही ते म्हणाले.

नाथाभाऊ, नाथाभाऊ आहे. पक्षात कुठलीही घुसमट नाही. कोणी सोबत नसताना मी एकट्याने जळगावला जागा लढविल्या होत्या. प्रतिकुल परिस्थितीत मी एकट्याने डॉ.के.डी. पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले, त्यानंतर विरोधात असताना 34 नगरसेवक निवडुन आणले ते एकट्याच्या बळावर असंही खडसेंनी सांगितलं.

Loading...
Loading...

माझ्या आवाजाची क्‍लीप महापालिका निवडणुकीत व्हायरल केली म्हणजेच माझी गरज आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही महाराष्ट्रात मीच भाजप-शिवसेनेची युती तोडली म्हणून भाजपला यश मिळाले. गिरीश महाजन काय नि नाथाभाऊ काय, पक्षात ज्येष्ठत्व नाकारले जात नाही हेच शेवटी खरे आहे असंही खडसेंनी आवर्जून सांगितलं.

 

हेही वाचा

आता व्हॉट्सअॅप तुमच्या स्टेटसवरून पैसे कमावण्याच्या तयारीत!

विराटचं शतक वाया, इंग्लंडचा 31 धावांनी विजय

 पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षावाले बनले महापौर, राहुल जाधव 80 मतांनी विजयी

सासरच्यांनी विवाहितेला खांबाला बांधून जिवंत जाळलं,आरोपी अजूनही मोकाटच

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2018 06:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close