कोल्हापूर,09सप्टेंबर: मी पळून गेलो नाही तर मला पळवून लावण्यात आलं अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोतांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींवर केली आहे.
सदाभाऊ खोतांना काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडले. मला संघटनेतून घालवलं होतं असंही ते यावेळी म्हणाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी नव्या पक्षाची घोषणाही मुंबईत केली. तसंच संघटनेत झालेल्या चौकशीलाही मी ताठ मानेने सामोरा गेलो असंही ते म्हणाले.
30 सप्टेंबर इचलकरंजीतून सदाभाऊ खोत आपली नवी रणनीती जाहीर करणार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा