VIDEO : मावळमधल्या पराभवाला मीच जबाबदार - अजित पवार

VIDEO : मावळमधल्या पराभवाला मीच जबाबदार - अजित पवार

जनतेनं या निवडणुकीत दिलेला कौल स्वीकारला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे.

  • Share this:

मुंबई 28 मे : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत सगळ्यात लढत गाजली ती मावळ मधली. मावळमध्ये अजित पवारांचा मुलगा पार्थ याचा परभाव झाला आणि पवार कुटुंबात पहिल्यांदाच पराभवाचा धक्का बसला. अजित पवार हे किंग मेकर समजले जातात. मात्र या निवडणुकीत त्यांना आपल्या मुलालाही निवडून आणता आलं नाही. या पराभवाची जबाबदारी माझीच आहे अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी व्यक्त केलीय.

अजित पवार म्हणाले, मावळमध्ये पार्थच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारलीय. जनतेनं या निवडणुकीत दिलेला कौल स्वीकारला आहे. तसचं आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची आज आढावा बैठक झाली. त्यात राज्यातल्या परभावाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली.

पक्षाला मजबुत करण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली. राज्यात आता दुष्काळाचं संकट असून त्याची तीव्रता कमीत कमी कशी करता येईल यावर भर देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितंल.

फडणवीस राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत

लोकसभेत भाजपने देशात स्पष्ट बहुमत मिळवलं. भाजपने लोकसभा निवडणुकीतल्या अभूतपूर्व यशानंतर आगामी काळात होणाऱ्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रणनितीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर महाराष्ट्रात आघाडीच्या नेत्यांनी मंथन बैठक बोलावली होती.

महाआघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत राज्यातील दुष्काळावर चर्चा झाली. येत्या काळात पक्षाकडून दुष्काळावर आक्रमक भूमिका घेण्यात येणार आहे. तसेच दोन्ही पक्षांनी आगामी निवडणूक आघाडी करून लढण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही बैठक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले काही आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

भाजपला मिळालेल्या यशामुळे काही आमदार असा निर्णय़ घेऊ शकतात. यामध्ये कमी मताधिक्क्याने निवडून आलेले आमदार भाजपच्या जाळ्यात अडकतील अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली. कमीत कमी आमदार जातील याकडे लक्ष ठेवून असल्याचंही जयंत पाटील सांगितलं.

लोकसभेनंतर 2019 च्या शेवटी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपने यासाठीची रणनिती आखण्यास आतापासूनच सुरुवात केल्याचं यावरून दिसतं. भाजपने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला खिंडार पाडून अनेक नेत्यांना पक्षात घेतलं होतं. तोच पॅटर्न विधानसभा निवडणुकीत वापरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना राज्यात शह देण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 10:01 PM IST

ताज्या बातम्या