विखे पाटील नशीबवान, भाजपमध्ये आले आणि मंत्री झाले - खडसे

कधी कधी मुख्यमंत्र्यांना वाटतं की मी विरोधी पक्षात तर जाणार नाही ना?

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 03:30 PM IST

विखे पाटील नशीबवान, भाजपमध्ये आले आणि मंत्री झाले - खडसे

मुंबई 24 जून : भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मंत्रिमंडळातून जावं लागणं आणि पुन्हा परत येण्याची संधी न मिळणं याची खंत एकनाथ खडसेंच्या मनात कायम आहे. अनेकदा भाषणात ते आपल्या मनातली खदखद व्यक्त करत असतात. आज विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवारांची निवड झाल्यानंतर केलेल्या भाषणातही त्यांच्या मनातली सल व्यक्त झाली. राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते होते. तिथून ते भाजमध्ये आले आणि मंत्री झाले असं सांगत ते नशीबवान असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत.

एकनाथ खडसे म्हणाले, विजय वडेट्टीवारांना योगायोगामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळालं. विखे पाटीलांमुळे तुम्हाला विरोधी पक्षनेते पद मिळालं. कधी कधी मुख्यमंत्र्यांना वाटतं की मी विरोधी पक्षात तर जाणार नाही ना? विखे पाटील नशीबवान आहेत की त्यांनी विरोधी पक्ष पद सोडलं आणि त्यांना मंत्री पद मिळालं. आमच्यात नेमकं काय झालंय ते मला आणि मुख्यमंत्र्यांनाच माहिती आहे असंही त्यांनी सांगितलं.

गिरीश आत्ता आला. आधी तो निर्णय प्रकियेत नव्हता. तो जवळ झाला आणि मुनगंटीवार 5व्या नंबरचे मंत्री झालेत असा टोलाही त्यांनी लगावला.

वडेट्टीवारांना हवी खडसेंची मदत

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची आज विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विरोध पक्षनेत्याच्या आसनाजवळ जाऊन बसवलं आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंत सर्व नेत्यांनी वडेट्टीवारांना शुभेच्छा देणारी भाषणं केलीत. शेवटी वडेट्टीवारांनीही सर्वांचे आभार मानले. या सर्वांच्या भाषणात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांचा सर्वांनी आवर्जुन उल्लेख केला आणि मुख्यमंत्र्यांवर शरसंधान करण्यासाठी त्याचा वापर केला. वडेट्टीवारांनी तर विरोधी पक्षनेतेपदावर काम करताना तुमची मदत लागेल अशी गळच त्यांना घातली आणि सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला दाद दिली.

Loading...

आतुन नाही तर बाहेरून मदत करा

विजय वडेट्टीवार म्हणाले,आदिवासी भागातून मी माझ्या कारकीर्दीची सुरुवात केली. मी उपेक्षित, दुर्लक्षित माणसाला पुढे आणण्यासाठी अविरत काम केलं. मी शिवसेनेत काम केलं नसतं तर मी आज या ठिकाणी आलो नसतो. मी सत्ताधाऱ्यांकडे जनतेच्या हिताची कामं घेऊन गेलो, वैयक्तिक काम कधीही नेली नाहीत. विरोधी पक्षनेते असताना खडसेंचं भाषण आम्ही बाहेर असेल तर धावत जाऊन ऐकायचो, नाथाभाऊंच्या मार्गदर्शनाची मला अत्यंत आवश्यकता आहे. थेट मार्गदर्शन करता येत नसेल तर त्यांनी अदृश्य रुपात मार्गदर्शन करावं अशी कोपरखळीही त्यांनी मारली त्याला विरोधीपक्षांसह सत्ताधाऱ्यांनीही हासून दाद दिली.

वडेट्टीवार पुढे म्हणाले, नारायण राणे विरोधी पक्षनेते असताना सरकारची पळता भुई थोडी व्हायची, टी ट्वेंटीची मॅच खेळताना एकटं खेळून चालत नाही चांगली टीम लागते असं त्यांना अजित वारांना सांगितलं. ज्याला महत्त्वाकांक्षा नाहीये तो राजकारणात राहू शकत नाही. सीएम साहेब तुम्हाला  दिल्लीत पाहायचंय असंही वडेट्टीवारांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...