S M L

मी खूप बलाढ्य नेता, विरोधकांनी 2024 ची तयारी करावी -चंद्रकांत पाटील

हल्लाबोल आंदोलन म्हणजे फक्त सहल आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली

Sachin Salve | Updated On: Apr 13, 2018 08:55 PM IST

मी खूप बलाढ्य नेता, विरोधकांनी 2024 ची तयारी करावी -चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, 13 एप्रिल : विरोधकांनी 2019 साठी वेळ आणि पैसा वाया न घालवता 2024 च्या निवडणुकीची तयारी करावी असं सांगत मी खूप बलाढ्य नेता असल्याचंही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  विरोधकांना ठणकावून सांगितलंय. ते कोल्हापुरात बोलत होते.

कोल्हापूरमध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. कोल्हापूर शहरातल्या अतिक्रमणांना चंद्रकांत दादा पाठीशी घालत असल्याचा आरोप झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी  आपली भूमिका प्रसिद्धीमाध्यमांसमोर मांडली.

काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्याकडे सध्या कोल्हापूरची महापालिका आहे, पण सतेज पाटील यांचे नाव न घेता गेल्या 20 वर्षातील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणे काढणार, त्यांच्यावर कारवाई करणार असा निर्वाणीचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं हल्लाबोल आंदोलन केलं पण त्यांनं काय फरक पडला. आम्ही जामनेर आणि आजरा नगरपंचायत जिंकल्याचं ना.. हल्लाबोल आंदोलन म्हणजे फक्त सहल आहे अशी टीका  चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलीये.

यावेळी आता राज्यात काँग्रेसही आंदोलन करणार असून त्याची सुरुवात राहुल गांधींच्या दौऱ्याने कोल्हापूरमधून होणार आहे. याबाबत विचारला असता राहुल गांधींना भरपूर वेळ आहे असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 08:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close