News18 Lokmat

बॅटरी संपल्याने स्विच ऑफ झाला पत्नीचा मोबाइल, गैरसमजातून पतीची आत्महत्या

बॅटरी संपल्याने पत्नीचा मोबाइल स्विच ऑफ झाल्याने गैरसमजातून पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नामदेव शंकर गुंजाळ असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 07:43 PM IST

बॅटरी संपल्याने स्विच ऑफ झाला पत्नीचा मोबाइल, गैरसमजातून पतीची आत्महत्या

औरंगाबाद, 1 जुलै- बॅटरी संपल्याने पत्नीचा मोबाइल स्विच ऑफ झाल्याने गैरसमजातून पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नामदेव शंकर गुंजाळ असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी (30 जून) मध्यरात्री करमाड येथे ही घटना घडली.

मिळालेली माहिती अशी की, नामदेव गुंजाळ यांचे पत्नीशी वाद झाला होता. रागाच्या भरात ती माहेरी निघून गेली होती. 10 दिवसांनी नामदेवने पत्नीला फोन करून घरी येण्याची विनंती केली. पत्नीने देखील ती मान्य करून ती पुण्याहून औरंगाबादला येण्यास तयार झाली. दरम्यान, नामदेवने पत्नीला कॉल केला असता बोलताना तिच्या मोबाइलची बॅटरी संपल्याने तो स्विच ऑफ झाला. पत्नीने जाणूनबुजून मोबाइल बंद केल्याचा गैरसमजातून नामदेवने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याहून पत्नी घरी आली तेव्हा पतीने गैरसमजातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने तिला मोठा धक्का बसला. याप्रकरणी करमाड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जालन्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद; शस्त्रांसह 2 लाखांचा ऐवज जप्त

जालना शहरापासून जवळच असलेल्या राजूर रोडवर काही दिवसांपूर्वी सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याची गाडी अडवून केलेल्या लूटमार प्रकरणातील दरोडेखोरांची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपीकडून शस्त्रांसह लुटीतील दोन लाखांचा ऐवज आणि गुन्हयात वापरण्यात आलेल्या 2 कार देखील जप्त करण्यात आल्या.

राजूर येथील बाफना ज्वेलर्सचे मालक विनयकुमार बाफना आणि त्यांचा मुलगा नवनीत बाफना हे त्यांच्या स्विफ्ट कारमधून जालन्याकडे येत असताना त्यांच्या कारला ओव्हरटेक करून एका इंडिकाने घानेवाडी पाटीजवळील एका ढाब्याजवळ अडवले होते. पाठीमागून आलेल्या एका दुसऱ्या स्कोडा कारने धडक दिली होती.

Loading...

दोन्ही कारमधून उतरलेल्या दरोडेखोरांनी हातातील लोखंडी रॉडने बाफना यांच्या कारचा काच फोडून पितापुत्रांना रॉड, तलवारीने बेदम मारहाण करून कारमधील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 1, 2019 07:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...