10 वर्षीय मुलीसामोर बापाने वायरने गळा आवळून केला आईचा खून

10 वर्षीय मुलीसामोर बापाने आईचा वायरने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी फरार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. वंदना उत्तम जाधव असे खून झालेल्या महिलेचे तर उत्तम महादू जाधव असे आरोपी पतीचे नाव आहे.

News18 Lokmat | Updated On: May 9, 2019 03:35 PM IST

10 वर्षीय मुलीसामोर बापाने वायरने गळा आवळून केला आईचा खून

गोविंद वाकडे (प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड, 9 मे- 10 वर्षीय मुलीसामोर बापाने आईचा वायरने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी फरार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. वंदना उत्तम जाधव असे खून झालेल्या महिलेचे तर उत्तम महादू जाधव असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा भाऊ पुंडलिक शामराव वाघमारे यांनी सांगवी पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी पती उत्तम जाधव हा पत्नी वंदना आणि मुलांना दररोज मारहाण करत होता. त्यांच्यात नेहमी वाद होत होते. वंदना यांना ओंकार आणि दीपाली (वय-10) अशी दोन मुले आहेत. आरोपी उत्तम जाधव याला दारूचे व्यसन आहे. बुधवारी तो दुपारी दारू पिऊन घरी आला होता. तेव्हा देखील त्याने मुलांना आणि पत्नी वंदनाला मारहाण केली होती. त्याचप्रकारे रात्री देखील असाच प्रकार घडला. मुलांना आणि पत्नीला आरोपी उत्तम ने जेवण करू दिले नाही. वंदना यांचे पती उत्तमसोबत कडाक्याचे भांडण झाले. वंदना यांनी त्यांचा मुलांना झोपवले. मध्यरात्री नराधम उत्तमने हातात वायर घेऊन आपल्या दहा वर्षीय मुलीसमोर तिच्या आईचा गळा आवळला. या घटनेत त्या बेशुद्ध झाल्या त्यांना घरासमोरील मोरीत टाकून दिले आणि घराला कडी लावून आरोपी उत्तम फरार झाला. आत अडकलेल्या मुलीने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना जागे केले. बेशुद्ध झालेल्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. वंदनाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी बापावर सांगवी पोलिसात गुन्हा दाखल केला असून शोध घेतला जात आहे.


VIDEO:भाजपच्या प्रचाराचे मुद्दे काँग्रेसकडून हायजॅक

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2019 03:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...