'बाबांनी आधी आईवर चाकूने वार केले आणि नंतर स्वत: आत्महत्या केली'

'बाबांनी आधी आईवर चाकूने वार केले आणि नंतर स्वत: आत्महत्या केली'

फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटक पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि त्यात पतीने चक्क पत्नीचा गळा कापून तिची हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

सातारा, 06 डिसेंबर : महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबात धक्कादायक प्रकार घडला आहे. फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटक पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि त्यात पतीने चक्क पत्नीचा गळा कापून तिची हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दोघांमध्ये हॉटेलच्या रुमवर वाद झाला आणि वाद शिगेला पोहचल्यानंतर पतीने पत्नीची हत्या केली. यात सगळ्यात गंभीर म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्या करण्य़ाचा प्रयत्न केला. उपाचारादरम्यान, पतीचाही मृत्यू झाला आहे.

दरम्यान, हा सगळा प्रकार या जोडप्याच्या 11 वर्षाच्या मुलाने पाहिला. आपल्या आईची हत्या आणि वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यांचाही मृत्यू झाल्यामुळे त्यांचा मुलगा मोठ्या धक्क्यात आहे.

अनिल सुभाष शिंदे आणि सिमा शिंदे असं या पती पत्नीचं नाव आहे. ते पुण्यातल्या धानोरीमधील विश्रांतवाडीमध्ये राहणारे आहेत. पती-पत्नी आणि त्यांचा 11 वर्षांचा आदित्य फिरण्यासाठी महाबळेश्वरला गेले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू ताब्यात घेतला आहे.

या सगळ्या प्रकरणाचा पोलीस आता कसून तपास करणार आहेत तर यात आदित्यचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

पर्यटनासाठी गेलेल्या जोडप्यांमध्ये असा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण महाबळेश्वर हादरून गेलं आहे तर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.


VIDEO : 'बायको परतली नाही, तर उडी टाकेन', असं म्हणत 'तो' चक्क टॉवरव चढून बसला


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 12:40 PM IST

ताज्या बातम्या