कोल्हापूरात पतीने खुरप्याने वार करून केली पत्नीची निर्घृण हत्या

कोल्हापूरात पतीने खुरप्याने वार करून केली पत्नीची निर्घृण हत्या

कोल्हापूरमध्ये कागल तालुक्यातील भडगावमध्ये पतीकडून पत्नीचा खून करण्यात आला आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 14 जुलै : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक खून प्रकरण समोर आलं आहे. कोल्हापूरमध्ये कागल तालुक्यातील भडगावमध्ये पतीकडून पत्नीचा खून करण्यात आला आहे. चक्क शेतात वापरण्यात येणाऱ्या खुरप्याने वार करून पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

पतीच्या या अमानुष कृत्याबद्दल परिसरात संताप माजला आहे. दिपाली पोवार असं या पतीचं नावं आहे. त्याने खुरप्याने पत्नीवर सपासप वार करून तिचा जीव घेतलाय. शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. पण आरोपी पती मात्र फरार आहे.

LIVE India vs England 2nd ODI : इंग्लंडने जिंकला टॉस, फलंदाजीचा निर्णय

हा खून करण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने पालीस आता या प्रकरणाचा तपास करत आहे. मृत पत्नीचा मृतदेह पोर्स्टमार्टमसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस आता फरार आरोपीचा कसून शोध घेत आहे.

हेही वाचा...

पत्नीला पास करण्यासाठी अजब शक्कल, कॉलेज संचालकाने प्राध्यापकाकडूनच सोडवले पेपर

स्कूल बसच्या चाकाखाली चिरडून 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

VIDEO : पोलीस जवानांसोबत मुख्यमंत्रीही उभे राहिले जेवणाच्या रांगेत

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2018 03:21 PM IST

ताज्या बातम्या