पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करुन डोक्यात घातला सिलेंडर!

डोक्यात हैवान शिरलेल्या नवऱ्याने बेदम मारहाण करुन बेशुद्धअवस्थेत अवनीला एका रूममध्ये कोंडुन ठेवले बाहेर फिरायला ही जाऊन आला

  • Share this:

 शिवाजी गोरे,रत्नागिरी, 11 नोव्हेंबर : शुल्लक कारणावरुन दिवाळीच्या पूर्वसंध्येला माहेरवाशीन असलेल्या एका 27 वर्षीय विवाहितेवर नवऱ्याने चाकूने वार करून डोक्यात सिलेंडर घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्लात विवाहितेच्या डोक्याला 40 टाके पडले असून सध्या ती मुंबई येथे जे जे रुग्णालयात उपचार घेत आहे.

 या बाबत अधिक माहित अशी की, दापोली येथील भारतीय स्टेट बँकेतील कर्मचारी रवींद्र खोपकर यांची मुलगी अवनी अल्पेश भोसले वय 27 हिचे अल्पेश भोसले (वय ३०) या तरुणाबरोबर लग्न झाले. काही दिवसांवर तिच्या लहान मुलीचा वाढदिवस होता. पतीच्या मते सदर वाढदिवस आपल्या आई वडिलांच्या गावी करण्याचा विचार होता मात्र पत्नी अवनी हिने या गोष्टीला विरोध केला होता.

 बाळंतपणाच्या वेळी तुमचे आई बाबा मला आणि मुलीला पहायला सुद्धा फिरकले नाहीत. त्यामुळे आपल्या मुलीचा वाढदिवस आपण आपल्या घरीच साजरा करू असे तिचे म्हणणे होते. मात्र, ही गोष्ट नवऱ्याला रुचली नाही त्याचा राग मनात धरून 4 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी साडे सहा वाजता या विषयावरुन दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

 रागाच्या भरात नवरा अल्पेश बापू भोसले याने अवनीवर खुनी हल्ला केला. चाकूचा वापर करुन अवनीच्या डोक्यावर सपासप वार केले. तो एवढ्यावरच न थांबता शरीरावरही चाकूने हल्ला चढवला तसंच क्रिकेटच्या बॅटने दोन्ही हातापायावर बॅटने फटके मारले आणि दोन्ही हात मोडले.

 डोक्यात हैवान शिरलेल्या नवऱ्याने बेदम मारहाण करुन बेशुद्धअवस्थेत अवनीला एका रूममध्ये कोंडुन ठेवले बाहेर फिरायला ही जाऊन आला. आल्यावर रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेल्या अवनीला पुन्हा बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पोटावर आणि मानेवर पाय ठेऊन घरातील सिलेंडर ही तिच्या डोक्यात घालून जिव मारण्याचा प्रयत्न केला.

 घटना घडत असतानाच इमारतीमधील काही शेजाऱ्यांनी दिवाळीचा कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी अल्पेश भोसले याच्या घरी आले असताना हा प्रकार समोर आला. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेल्या आपल्या पत्नीला गाडीत टाकून तो पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला पण जबर जखमी झालेल्या अवनीला अधिक उपचारासाठी मुंबई येथे जे जे रूग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती पनवेल पोलिसाना मिळताच त्यांनी अवनीचे जाब जबाब नोंदवून घेतले आणि पती अल्पेश बापू भोसले यांच्यावर भा.द.वि.कलम 325 '326 आणि 496 (अ) अन्यवे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2018 05:31 PM IST

ताज्या बातम्या