नागपूर, 24 जुलै: बायकोच्या संपत्तीसाठी चक्क तिचा नवराच तिच्या जिवावर उठल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. जलील खान असं या नराधमाचं नाव आहे. त्यानं वाढदिवसाच्या केकमध्येच विष टाकून बायकोला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
जलील खान याने बायकोच्या वाढदिवसाला आणलेल्या केकमध्ये विष टाकलं होतं. विषयुक्त केक खाल्ल्यामुळे जलीलच्या बायकोची प्रकृती खालावली. आलीया असं जलीलच्या बायकोचं नाव असून ती नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल आहे. पोलीस तपासात जलीलनं बायकोवर विषप्रयोग केल्याची माहिती समोर आली. आलियाच्या नावावर असलेलं घर हडपण्यासाठी त्याने स्वतःच्या बायकोलाच वाढदिवसाच्या केकमध्ये विष घालून मारण्याचा प्रयत्न केलाय. या षडयंत्रात आलिया मरण पावली असती तर तिच्या नावावरचं घर आपल्याला मिळेल या हेतूने आरोपीने हे कृत्य केल्याच पोलिस तपासातून पुढे आलंय.
नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या परिसरात राहणारा जलील खान सध्या फरार असून त्याचा नागपूर पोलिस या प्रकरणात शोध घेत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा