2000 फूट खोल दरीत दाम्पत्याने घेतली उडी.. टोकाचे पाऊल उचलण्यामागे हे आहे कारण!

गणेश व राधाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. मुलगा घरी असल्यामुळे ते बचावला. घरगुती वादातून या दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह दरीतून काढण्याचे काम सुरु आहे.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 03:14 PM IST

2000 फूट खोल दरीत दाम्पत्याने घेतली उडी.. टोकाचे पाऊल उचलण्यामागे हे आहे कारण!

संजय शेंडे (प्रतिनिधी),

अमरावती, 1 मे- चिखलदरा येथील भीमकुंड पॉईंटवरुन 2000 फूट खोल दरीत उडी घेऊन एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बुधवारी  सकाळी 9 वाजता घटना घडली आहे. गणेश झगुजी हेकडे (वय- 25) व राधा गणेश हेकडे (वय-22, रा. शहापूर) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. गणेश हा कुस्तीपटू असल्याची माहिती मिळाली आहे. गणेश व राधाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. मुलगा घरी असल्यामुळे ते बचावला. घरगुती वादातून या दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे समजते.  या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह दरीतून काढण्याचे काम सुरु आहे.


काय आहे प्रकरण?

मागील तीन आठवड्यांपासून राधा माहेरी मोथा गावी गेली होती. गणेश तिला घेण्यासाठी गेला होता. गणेशने तिची समजूत काढून दुचाकीवरुन घराकडे निघाले होते. वाटेत पर्यटनस्थळ भीमकुंड पाहाण्यासाठी दोघे थांबले होते. यादरम्यान दोघांनी सुमारे 2000 फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केली. चिखलदरा पोलिस घटनास्थळी पोहोचले आहे. गणे व राधाने घरगुती वादातून आत्महत्येसारखे  टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

Loading...


VIDEO: नक्षलवाद्यांचा पुन्हा भ्याड हल्ला, 15 जवान शहीद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2019 01:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...