पनवेलमध्ये पूरात वाहून गेलं दाम्पत्य; 4 दिवसांनी सापडला पतीचा मृतदेह

पनवेलमधील गाढी नदीच्या पूरात दाम्पत्य वाहून गेलं होते. चार दिवसांनी एकाचा मृतदेह सापडला आहे. आदित्य आणि सारिका आंब्रे असे दाम्पत्याचे नाव आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2019 07:54 PM IST

पनवेलमध्ये पूरात वाहून गेलं दाम्पत्य; 4 दिवसांनी सापडला पतीचा मृतदेह

विनय म्हात्रे, (प्रतिनिधी)

नवी मुंबई, 11 जुलै- पनवेलमधील गाढी नदीच्या पूरात दाम्पत्य वाहून गेलं होते. चार दिवसांनी एकाचा मृतदेह सापडला आहे. आदित्य आणि सारिका आंब्रे असे दाम्पत्याचे नाव आहे. चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पती आदित्य आंब्रे यांचा मृतदेह सापडला आहे. सारिका आंब्रे अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मिळालेली माहिती अशी की, आदित्य आणि सारिका हे दाम्पत्य बाईकसह गाढी नदीच्या पूरात वाहून गेलं होतं.

गाढी नदीच्या पूरामुळे उमरोली गावाचा संपर्क तुटला होता.पाण्याखाली गेलेल्या पुलावरून आंब्रे दाम्पत्य बाईक वरून जात होते. त्याचवेळी ते वाहून गेले होते. मागील चार दिवसांपासून त्यांचा शोध घेण्यात येत होता. आदित्य आंब्रे यांचा मृतदेह सापडला आहे. सारिका आंब्रे अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

दुसरीकडे, मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. वाशिष्ठी पूलावरून वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. मार्गावरील वाहतूक गुहागर बायपासने वळवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गटारात पडलेल्या चिमुकल्याचा शोध सुरू..

Loading...

गोरेगावच्या आंबेडकर नगरमध्ये 3 वर्षांचा मुलगा खेळताना गटारात पडल्याची धक्कादायक घटना घडली. जेसीबीच्या माध्यमातून सुरू असलेली शोध मोहीम थांबवण्यात आली असून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गटार फोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, अजुनही मुलगा सापडला नाही. दरम्यान याप्रकरणी येथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. पण त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

बापाने मुलाला बंदुकीत भरायला लावल्या बुलेट्स, भलतेच संस्कार देणारा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2019 07:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...