News18 Lokmat

राणेंची अवस्था भाजपनं अतिशय वाईट केलीये, हुसेन दलवाईंची खोचक टीका

राणेंची ही परिस्थिती पाहून खूप वाईट वाटतंय, काँग्रेसने कधीही राणेंवर अशी वेळ येऊ दिली नाही, असा पुनरुच्चार खासदार हुसेन दलवाई यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यान दापोली येथे केला आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2017 11:19 AM IST

राणेंची अवस्था भाजपनं अतिशय वाईट केलीये, हुसेन दलवाईंची खोचक टीका

रत्नागिरी, 15 नोव्हेंबर : काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंनी पुन्हा एकदा नारायण राणेंवर खोचक टीका केलीये. राणेंना काँग्रेसमध्ये सन्मानपूर्वक घेण्यात आले होते , राणेंनी सकाळी पक्ष प्रवेश केला व त्याच दिवशी त्यांचा मंत्रिमंडळात प्रवेश दिला होता, मात्र भाजपाने राणेंना  भाजपात घेऊन मंत्रिपदाचे आश्वासन दिले, मात्र पक्ष प्रवेश करून घेतला नाही, उलट वेगळा पक्ष काढण्याचा सल्ला दिला.

भाजपाने  आज राणेंनी परिस्थिती अतिशय वाईट केली आहे, राणेंची ही परिस्थिती पाहून खूप वाईट वाटतंय, काँग्रेसने कधीही राणेंवर अशी वेळ येऊ दिली नाही, असा पुनरुच्चार खासदार हुसेन दलवाई यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यान दापोली येथे केला आहे, त्यामुळे हुसेन दलवाई यांच्या प्रश्नाला राणे काय उत्तर देतात हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2017 11:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...