S M L

प्रदूषणामुळे कृष्णा नदीत शेकडो माशांचा मृत्यू; प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष

पाण्याची खालावलेली पातळी आणि कमी झालेलं ऑक्सिजनचं प्रमाण याचा जलचरांवर विपरित परिणाम झाला आहे. नदीतील मासे, खेकडे मृत पावलेत.

Sachin Salve | Updated On: Feb 4, 2018 12:22 PM IST

प्रदूषणामुळे कृष्णा नदीत शेकडो माशांचा मृत्यू; प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष

04 फेब्रुवारी : सांगलीमध्ये कृष्णा नदीत शेकडो माशांचा प्रदूषणामुळे मृत्यू झाला आहे. पाण्याची खालावलेली पातळी आणि कमी झालेलं ऑक्सिजनचं प्रमाण याचा जलचरांवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे नदीतील मासे, खेकडे मृत पावलेत.

कृष्णा नदीत मृत माश्यांचा खच्च पडला आहे. प्रदूषित पाण्यामुळे नदीतील ऑक्सिजन कमी झाल्यानं नदीतील मासे मृत्युमुखी पडले आहेत. काही मासे तडफडून मारतायत. नदीतील जलचर प्राण्यांच्या जीवाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झालाय. नदीमध्ये मासे, खेकडा यांसह अनेक जलचर प्राण्यांच्या मृतांचा खच पडलेला आहे. नदी प्रदूषणामुळे पुन्हा एकदा जलचर प्राण्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

सांगली शहराजवळ शेरी नाल्यासह अन्य तीन नाले कृष्णा नदीत मिसळतात. यामुळे कृष्णा नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालंय. त्यातच सध्या कृष्णेची पाणी पातळी कमी झाल्यानं नदीतील माशांचं जीवन धोक्यात आलं आहे. मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2018 12:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close