सांगलीत नरबळी ?

या मृतदेहाच्या डोक्याच्या मागच्या भागावर धारदार शस्त्रानं त्यांच्यावर वार केले होते. विशेष म्हणजे मृतदेहाच्या अवतीभोवती हळद-कुंकू, लिंबू आणि टाचण्या आढळल्या. त्यामुळे हे नरबळीचं प्रकरण आहे, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 19, 2017 01:02 PM IST

सांगलीत नरबळी ?

सांगली, 19 ऑक्टोबर: सांगली जिल्ह्यातल्या शिराळामध्ये नरबळीचं धक्कादायक प्रकरण घडल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. चक्र भैरवनाथ मंदिरात एका 50 वर्षांच्या पुरुषाचा मृतदेह सापडला आहे.  या मृतदेहाची अवस्था पाहून त्याचा नरबळी दिल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

या मृतदेहाच्या डोक्याच्या मागच्या भागावर धारदार शस्त्रानं त्यांच्यावर वार केले होते. विशेष म्हणजे मृतदेहाच्या अवतीभोवती हळद-कुंकू, लिंबू आणि टाचण्या आढळल्या. त्यामुळे हे नरबळीचं प्रकरण आहे, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता अमावास्येला प्रारंभ झाला. शनिवारी सायंकाळी साडेपाचला अमावास्या संपली. याच दरम्यान हा खून झाला असावा असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. पण पोलिसांनी ही शक्यता फेटाळून लावलीये. शिराळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिरसी-शिवरवाडी रस्त्यावर अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावर चक्र भैरवनाथ मंदिर आहे.

हा परिसर निर्जन आहे. गेल्या काही महिन्यापासून या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता गवंडी आणि मजूर मंदिराच्या कामावर आले.

त्यावेळी त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात अज्ञाताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आलं होतं.

Loading...

त्यामुळे आता नक्की हा मृत्यू का झाला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2017 01:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...