HSC Result : बारावीचे निकाल आज जाहीर होणार!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज (मंगळवारी) बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 28, 2019 07:17 AM IST

HSC Result : बारावीचे निकाल आज जाहीर होणार!

पुणे, 28 मे : गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या बारावी बोर्डाचे निकाल आज जाहीर होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मंगळवारी बारावीचे निकाल जाहीर केले जातील. बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल 28 मे रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहेत. उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे निकाल तुम्ही News18 Lokmat या आमच्या वेबसाईटवर थेट बघू शकता. ऑनलाईन निकाल कसे बघायचे यासाठी स्क्रोल डाऊन करून खालचा परिच्छेद पाहा. गेल्या वर्षी 10 वी चा निकाल 89.41 टक्के एवढा होता आणि 12 वी चा निकाल 88.41 टक्के होता. गेल्या वर्षी 30 मे रोजी निकाल लागला होता. यंदा दोन दिवस अगोदर बारावीचा रिझल्ट विद्यार्थ्यांच्या हाती येणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर निकाल

बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर दुपारी 1 वाजता निकात जाहीर होतील. त्याच वेळी News18Lokmat च्या वेबसाईटवरही निकाल पाहता येतील. HSC चे विद्यार्थी MSBSHSE बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.



Loading...

राज्यात 12 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात झाली होती. तर 10 वी परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या काळात घेण्यात आली. दहावी आणि बारावीचे निकाल mahresult.nic.in या वेबसाइटवर तुम्हाला मिळू शकतील.

येथे थेट चेक करु शकता तुमचा निकाल

दहावीचे निकाल पहिल्या आठवड्यात?

बारावीपाठोपाठ दहावीचे निकाल जून 2019 च्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाकडून अद्याप अधिकृतपणे तारीख जाहीर झालेली नाही. निकालाच्या आधी 2 दिवस तारीख जाहीर होईल.


VIDEO: सलूनमध्ये तुफान राडा; मॉडेल आणि कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: HSC Result
First Published: May 28, 2019 07:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...