S M L

मुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल?

सुट्टी सुरू झाली की विविध शिबिरांच्या जाहिरातीही झळकू लागतात. मग अशा वेळी नक्की कुठल्या शिबिराला पाठवायचं हा पालकांपुढे यक्षप्रश्न उभा राहतो.

Sonali Deshpande | Updated On: Apr 26, 2018 12:31 PM IST

मुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल?

26 एप्रिल : शाळांना उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालीय. हल्ली पूर्वीसारखं मुलं आजोळी जात नाहीत. कारण मामाचं गावच हरवून गेलंय. बऱ्याच घरात मुलं एकटीच असतात. त्यांना खेळायलाही कोणी नसतं. मग अशा वेळी पालक आपल्या मुलांना शिबिरात पाठवतात. शिबिरांमधून मुलांमधली कौशल्य विकसित होतातच. पण घराबाहेरच्या व्यक्तींशी संवादही वाढतो.

सुट्टी सुरू झाली की विविध शिबिरांच्या जाहिरातीही झळकू लागतात. मग अशा वेळी नक्की कुठल्या शिबिराला पाठवायचं हा पालकांपुढे यक्षप्रश्न उभा राहतो. त्यात मुलांची सुरक्षाही महत्त्वाची असते.

हे मुद्दे नक्की लक्षात ठेवा

मुलाला कोणत्या शिबिराला पाठवताय?

मुलांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था कशी आहे?

Loading...

शिबीर सरकारमान्य आहे का ?

शिबिरादरम्यान डॉक्टर सोबत आहेत का?

शिबिराचे आयोजक, प्रशिक्षकांचा तिथल्या जागेचा अभ्यास आहे का?

शिबिरादरम्यान सुरक्षाव्यवस्था असणार आहे का?

कोणत्या पद्धतीची सुरक्षाव्यवस्था शिबिरादरम्यान असेल?

ज्या ठिकाणी शिबीर होणार आहे तिथे पुरेशी सुरक्षाव्यवस्था आहे का?

जास्त मुलं घेऊन जाण्याची क्षमता शिबिराच्या आयोजकांची आहे का?​

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2018 12:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close