पुणे, 06 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या कशासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून केली याचं गूढ अजून पूर्णपणे उलगडलेलं नाहीय. पण शरद कळसकरच्या चौकशीतून सीबीआयला महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यातून दाभोलकरांवर गोळ्या झाडल्यानंतर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर पळून कसे गेले, याचा उलगडा झालाय. अतिशय चलाखीनं त्यांनी सीसीटीव्ही नसलेला रस्ता शोधून काढला होता. पाहूया त्याच्याचबद्द्लचा एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.