OPINION : राज ठाकरे आणि शरद पवार भाजपला देणार का धक्का ?

OPINION : राज ठाकरे आणि शरद पवार भाजपला देणार का धक्का ?

राज ठाकरेंनी त्यांच्या सभांमधून 'डिजिटल इंडिया' वर टीका केली तेव्हा भाजप विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष चांगलाच उफाळून आला. भाजपला 2014 च्या निवडणुकांची पुनरावृत्ती घडवायची आहे पण काँग्रेस - राष्ट्रवादीनेही त्यांना टक्कर देण्याची तयारी केली आहे हेच यावरून दिसून आलं.

  • Share this:

व्यंकटेश केसरी

मुंबई, 16 एप्रिल : लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राज ठाकरेंच्या सभांमुळे राज ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाला आहे. एकेकाळी मोदींचे फॅन असलेले राज ठाकरे हे मोदींविरुद्धच्या प्रचारातले प्रमुख प्रचारक बनले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींविरुद्ध प्रचार करण्यासाठी राज ठाकरेंच्या सभांचा डाव खेळला, असं म्हटलं जातं. राज ठाकरेंच्या शैलीकडे आकर्षित होऊन तरुण मतदार मोदींवरुद्ध मतदान करू शकतात, अशी भीती भाजपला वाटते आहे.

'डिजिटल इंडिया'वर टीका

राज ठाकरेंनी त्यांच्या सभांमधून 'डिजिटल इंडिया' वर टीका केली तेव्हा तर भाजप विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष चांगलाच उफाळून आला. भाजपला 2014 च्या निवडणुकांची पुनरावृत्ती घडवायची आहे पण काँग्रेस - राष्ट्रवादीनेही त्यांना टक्कर देण्याची तयारी केली आहे हेच यावरून दिसून आलं.

महाराष्ट्राच्या निवडणुकांचं नियोजन करताना यावेळी मोदी आणि अमित शहांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीची ताकद मनात धरूनच केलं होतं. पण शरद पवार आणि राज ठाकरे भाजपचं हे नियोजन काही प्रमाणात बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हेदेखील या निवडणुकीत प्रमुख प्रचारकाच्या भूमिकेत आहेत.

मोदींचा थेट हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सभांमध्ये थेट शरद पवारांनर हल्लाबोल केला. याचाच अर्थ या आघाडीचा संभाव्य धोका मोदींना जाणवतो आहे. प्रकाश आंबेडकर आणि असादुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचं नुकसान होणार असलं तरीही भाजप आणि मोदींचे मुख्य विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच आहेत.

धोक्याची घंटा

विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यात तुल्यबळ लढती झाल्याची माहिती असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा आत्मविश्वासही वाढला आहे. काँग्रेसकडे प्रचारासाठी सध्या कोणताही मोठा चेहरा नाही. पण शरद पवार यांची रणनीती आणि राज ठाकरेंच्या हायटेक सभा यामुळे भाजपला धोक्याची घंटा वाजताना दिसते आहे.

2014 च्या निवडणुकीत मोदींनी दिलेली आश्वासनं कशी फोल ठरली हे राज ठाकरे व्हिडिओ क्लिप, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन या सगळया माध्यमांतून दाखवत असतात. त्यांच्या या शैलीकडे शहरी आणि निमशहरी भागातले तरुण आकर्षित होत आहेत.

मनसे नव्हे उनसे

बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना, असं म्हणत भाजपने राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. मनसे हा पक्ष उनसे म्हणजेच उमेदवार नसलेली सेना झाली आहे, असंही भाजपने म्हटलं आहे. पण राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावरचा हल्ला सुरूच ठेवला आहे.

ग्रामीण भागातली अशांतता,रोजगार, पाणीटंचाई या समस्या असताना भाजप राष्ट्रीय सुरक्षा, पाकिस्तानवरचा हवाई हल्ला असे विषय घेऊन प्रचार करतंय, अशा शब्दांत राज ठाकरेंनी भाजपची पोलखोल केली आहे. याचं रूपांतर मोदीविरोधी मतांमध्ये किती होतं हे मात्र पाहावं लागेल.

महाराष्ट्रात निवडणुकीचे अजून महत्त्वाचे तीन टप्पे आहेत. त्यामध्ये हा मतदानाचा पॅटर्न आणखी स्पष्टपणे समोर येईल. या लोकसभा निवडणुकीचा निकाल नेमका काय लागतो यावर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची समीकरणंही अवलंबून आहेत.

=================================================================================================================================================================

VIDEO : पुणेकर चौकीदार मोदींवर भडकला, म्हणाला...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 06:00 PM IST

ताज्या बातम्या