नागपुरात किती अनधिकृत मंदिर व्यवस्थापकांनी पैसे भरले ? हायकोर्टाचा सवाल

नागपुरात किती अनधिकृत मंदिर व्यवस्थापकांनी पैसे भरले ? हायकोर्टाचा सवाल

नागपूर शहरात असलेल्या सर्वधर्माच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईला आक्षेप घेणाऱ्या किती मंदिर व्यवस्थापकांनी पैसे भरले अशी विचारणा हायकोर्टाने केली आहे.

  • Share this:

नागपूर, 23 ऑगस्ट : नागपूर शहरात असलेल्या सर्वधर्माच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईला आक्षेप घेणाऱ्या किती मंदिर व्यवस्थापकांनी पैसे भरले अशी विचारणा हायकोर्टाने केली आहे. शहरातील सार्वजनिक स्थानांवरील धार्मिक स्थळांच्या कारवाईवर दाखल करण्यात आलेल्या एकूण १८३६ आक्षेपांपैकी सुमारे पाचशेहून अधिक धार्मिक संस्थांनी हायकोर्टाच्या आदेशानुसार रजिस्ट्रारकडे निधी जमा केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने शहरातील १५०४ धार्मिक स्थळांची यादी तयार केली. तसेच त्या धार्मिक स्थळांना कारवाईची नोटीस बजावली होती. तेव्हा महापालिका आयुक्तांकडे पहिल्या टप्प्यात ९७६ तर दुसऱ्या टप्प्यात ८६० आक्षेप दाखल करण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने ९७६ आक्षेप सादर करणाऱ्यांना प्रत्येकी ५० हजार तर ८६० आक्षेप दाखल करणाऱ्या धार्मिक स्थळांना प्रत्येकी ६० हजार रुपये न्यायालयात जमा करण्याचा आदेश दिला होता. त्यासाठी २१ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती.

दरम्यान, नागपूर महानगर पालिकेने शहरातील अवैध धार्मिक स्थळांसंदर्भात सभागृहात ठराव मंजूर करून अशी धार्मिक स्थळे नियमित करण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो राज्य सरकारला पाठविला आहे. शहरातील अनेक भागात अनधिकृत धार्मिक स्थळे कायम असून धार्मिक स्थळांसंदर्भात कारवाईवर हायकोर्टाचे बारीक लक्ष आहे. हायकोर्टाने मागील सुनावणी दरम्यान याप्रकरणातील धार्मिक संस्थांच्या प्रबंधनांकडून जमा झालेले पैसे विदर्भातील बालगृहांना दान करण्याची भुमिका घेतली होती. आता आठवडाभऱ्यानंतर यासंदर्भात हायकोर्ट आपला निर्णय देणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 05:31 PM IST

ताज्या बातम्या