घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या मुद्द्यावर विधानसभेत गदारोळ

घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या मुद्द्यावर विधानसभेत गदारोळ

विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे अखेर विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

  • Share this:

मुंबई,26जुलै: घाटकोपरमध्ये काल झालेल्या इमारत दुर्घटनेच्या मुद्दयावरून विधानसभेत विरोधकांनी आक्रमक होतं त्वरित चर्चा घेण्याची मागणी केली. विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे अखेर विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

सरकार अजून किती बळी घेणार असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी विचारला तसंच सारं कामकाज बाजूला ठेवून घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या मुद्दयावर चर्चा घेण्याची मागणीही त्यांनी केली. यावर अध्यक्ष प्रश्नोत्तरांच्या सत्रानंतर चर्चा 4 वाजता घेऊ असं म्हणाले. पण प्रश्नोत्तराचा तास रद्द करून या मुद्दयावर लगेच चर्चा व्हावी ही मागणी विरोधकांनी लावून धरली. स्थगत प्रस्ताव विधानसभेत दाखल करण्यात आला. चर्चा करू पण प्रश्नोत्तराच्या तासानंतर करू असं सत्ताधाऱ्यांचे म्हणणं होत.

या साऱ्यामुळे विधानसभेत झालेल्या गोंधळामुळे अखेर अध्यक्षांनी सभागृह तहकूब केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2017 11:38 AM IST

ताज्या बातम्या