कर्जतमध्ये घडला अजब प्रकार,जमिनीतून निघाली गरम वाफ

दगड हाताला चटका देईल इतकी गरम माती बाहेर पडू लागली.

Sachin Salve | Updated On: Jul 6, 2017 11:21 PM IST

कर्जतमध्ये घडला अजब प्रकार,जमिनीतून निघाली गरम वाफ

06 जुलै : कर्जतमधील अंबा माता मंदिरासमोर आज अचानक जमिनीतून धूर आणि गरम वाफ निघण्याचा प्रकार घडलाय.

जमिनीतून धूर आणि गरम वाफ निघाल्याची घटना घडल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना तातडीने कळवलं. पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन नगरपालिकेला बोलावलं. बघता बघता ही बातमी संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची गर्दी जमा झाली.

आधी टिकावच्या साहाय्याने जमीन खोदण्यात आली. सुरुवातीला केबल जळाली असावी किवा गॅसची लाईन लिक झाली असावी असे अंदाज व्यक्त करण्यात आलं.

खोदकाम करण्यात आलं काहीच सापडलं नाही. शेवटी जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करण्यात आलं तेव्हा गरम वाफ निघायला लागली. दगड हाताला चटका देईल इतकी गरम माती बाहेर पडू लागली. यावेळी भूवैज्ञानिकांनाही पाचरण करण्यात आलं मात्र या प्रकारामुळे सगळेच चक्रावलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 11:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close