S M L

सारंगखेडच्या अश्व बाजाराला सुरूवात;देशभरातून घोडे दाखल

तीनेश वर्षांहून अधिकची पंरपरा असलेल्या या घोडे बाजाराच्या व्यापक प्रसिद्धीसाठी पर्यटन विभागाने खास व्यवस्था केली आहे. यंदा घोडे बाजारात जवळपास दिड हजाराहून अधिक विविध प्रजातीचे उमदे घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 4, 2017 01:28 PM IST

सारंगखेडच्या अश्व बाजाराला सुरूवात;देशभरातून घोडे दाखल

 सारंगखेड, 04 डिसेंबर: अश्व प्रेमींसाठी पर्वणी असलेल्या सारंगखेडाच्या घोडे बाजाराला सुरूवात झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून रूबाबदार घोडे महोत्सवात दाखल होऊ लागले आहेत.

तीनेश वर्षांहून अधिकची पंरपरा असलेल्या या घोडे बाजाराच्या व्यापक प्रसिद्धीसाठी पर्यटन विभागाने खास व्यवस्था केली आहे. यंदा घोडे बाजारात जवळपास दिड हजाराहून अधिक विविध प्रजातीचे उमदे घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तसंच पर्यटनांना चालना देण्यासाठी यंदा चेतक फेस्टीवलला ग्लोबल रुप देण्याचं काम पर्यटन विभागाने सुरु केलं आहे.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तापी नदी पात्राच्या सान्निध्यात खास तंबूमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चेतक फेस्टीवल यंदा महिनाभर रंगणार असून यात घोड्यांची नृत्यस्पर्धा, शर्यत, सौदर्य स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी असणार आहे.सारंगखेड्यातले दत्तमंदीर महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असल्याने याठिकाणी महाराष्ट्रासोबत, मध्यप्रदेश आणि गुजरातचे भाविकही दर्शनासाठी येतात. यंदाचे बाजाराचे बदलले नवे रुप यामुळे अश्वशौकीन आणि भाविकांना मोहिनी घालत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 01:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close