राज्यात आता हुक्का पार्लरवर बंदी, नियमांचं उल्लंघन केल्यास...

सध्या राज्यात पेव फुटलेल्या हुक्का पार्लरवर आता बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारनं सिगरेट आणि तंबाखू उत्पादनसंबंधी अधिनियम 2003 कायद्यानुसार याची अधिसूचना काढली आहे. याचं उल्लंघन केल्यास...

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2018 09:56 AM IST

राज्यात आता हुक्का पार्लरवर बंदी, नियमांचं उल्लंघन केल्यास...

मुंबई, 08 ऑक्टोबर : सध्या राज्यात पेव फुटलेल्या हुक्का पार्लरवर आता बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारनं सिगरेट आणि तंबाखू उत्पादनसंबंधी अधिनियम 2003 कायद्यानुसार याची अधिसूचना काढली आहे. याचं उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

गुजरातनंतर हुक्का पार्लर बंदी लागू करणारं महाराष्ट्र दुसरं राज्य बनलं आहे. मुंबईतल्या कमला मिलमधल्या पबमध्ये लागलेल्या आगीनंतर हुक्का पार्लरवर बंदीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनं अधिनियमात हुक्का पार्लरचा स्पष्ट उल्लेख नसल्यानं हुक्का पार्लरवर बंदी घालता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. याचा गैरफायदा घेऊन सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर आता गंडांतर येणार आहे.

अवघी तरूणाई ज्या हुक्क्याच्या विळख्यात अडकतेय त्या हुक्का पार्लरवर कठोर निर्बंध घालणारा कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कमला मिल आग प्रकरणानंतर हुक्का पार्लरवर बंदी का नाही असा प्रश्न वारंवार समोर येत होता. हाच प्रश्न अनेक वेळा विरोधी पक्षाच्या आमदारांनीही विधानपरिषदेत उपस्थित केला.

त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना कमला मिल आग प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची समितीसुध्दा नेमण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं होतं.

हुक्का पार्लरवर जर कठोर निर्बंध आले आणि त्या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार असेल तर त्यामुळे हुक्का पार्लरमध्ये अडकलेली तरूणाई आणि त्यातून होणाऱ्या दुर्घटनांना आळा बसेल इतकं नक्की.

Loading...

 VIDEO: डॉक्टर तरुणीचा गळा कापणार 'तो' मांजा अजूनही तिथेच!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2018 09:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...