S M L

सोलापुरात सैराटची पुनरावृत्ती! आई-वडिलांनी आधी मुलीला संपवले; आज पतीचा मृतदेह आढळला

. ज्या ठिकाणी अनुराधावर शेतात अंत्यसंस्कार झाले होते तिथेच त्याचा मृतदेह आढळला आहे

News18 Lokmat | Updated On: Dec 9, 2018 03:30 PM IST

सोलापुरात सैराटची पुनरावृत्ती! आई-वडिलांनी आधी मुलीला संपवले; आज पतीचा मृतदेह आढळला


विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी

सोलापूर, 09 डिसेंबर : शेतातील सालगड्याच्या मुलाशी लग्न केलं म्हणून आई-वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केली होती. या प्रकरणाला महिना उलटत नाही तेच तिचा पती श्रीशैलचा मृतदेह आज आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.


सैराट सिनेमात घडावा असा प्रसंग रिअल लाईफमध्ये घडला. आॅक्टोबर महिन्यात  मंगळवेढ्याच्या सलगरमध्ये राहणारी अनुराधा बिराजदार हिने शेतातील सालगड्याच्या मुलाशी लग्न केलं होतं. आपल्या मुलीने सालगड्याच्या मुलाशी लग्न केल्यामुळे समाजात बदनामी होईल या भीतीने आई वडिलांनी पोटच्या मुलीला विष देऊन ठार मारले. ते एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी पहाटेच मुलीवर अंत्यसंस्कारही उरकले.  या घटनेनं सोलापूर जिल्हयात एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी वडील विठ्ठल आणि आई श्रीदेवी यांना अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

मध्यंतरी अनुराधाचा पती श्रीशैल आणि त्याच्या वडिलांनी एसपी ऑफीस सोलापूर इथं जाऊन आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार दिली होती. तसंच अनुराधाच्या आई वडील आणि इतर मारेकऱ्यांना शिक्षा करण्याची मागणी केली होती.

आज सकाळी अनुराधाचा पती श्रीशैल बिराजदारचा मृतदेह सलगर गावात आढळून आला. ज्या ठिकाणी  अनुराधावर शेतात अंत्यसंस्कार झाले होते तिथेच त्याचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. श्रीशैलने आत्महत्या केली की कुणी त्याची हत्या करून मृतदेह इथं टाकला याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. मंगळवेढा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले असून तपास सुरू आहे.

Loading...

काय आहे प्रकरण?

मयत अनुराधा विठ्ठल बिराजदार(वय २२ वर्षे) हिने सालगड्याच्या मुलाशी प्रेमविवाह केला होता.  अनुराधा कर्नाटकातील सिंदगी इथं बी.ए.एम.एस.चं शिक्षण घेत होती. तिथेच तिने शेतातील सलगड्याच्या मुलाबरोबर प्रेमविवाह केला. ही बाब वडील विठ्ठल धोंडाप्पा बिराजदार आणि आई श्रीदेवी विठ्ठल बिराजदार यांना पटली नाही. दि.२ आॅक्टोबर रोजी पहाटे १.३० वा.बोराळे येथील मुलीचे मामा बाळासाहेब म्हमाणे यांच्याकडे सोडून गेले. त्यानंतर 4 आॅक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास मुलीला घेऊन गेले आणि ५ आॅक्टोबर रोजी सलगर इथं अनुराधाला दोघा पती-पत्नींनी जिवे ठार मारून शेतात पहाटे ४ वाजेच्या सुमारास अंत्यविधी उरकला. मयत अनुराधा हिने मृत्यूपूर्वी दोन चिठ्या लिहून ठेवल्या होत्या.

त्यामध्ये वडिल आणि सावत्र आई यांच्यापासून  जिवाला धोका असल्याचं लिहून ठेवलं होतं त्यामुळे प्रकरणाचा खुलासा झाला. मामाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करून आई-वडिलांना अटक करण्यात आली होती.


======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2018 03:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close