लव्ह स्टोरीचा भयानक अंत, खोट्या प्रतिष्ठेसाठी लग्नानंतर आईनेच केला मुलीचा खून

मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीच्या आईने तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 14, 2019 01:23 PM IST

लव्ह स्टोरीचा भयानक अंत, खोट्या प्रतिष्ठेसाठी लग्नानंतर आईनेच केला मुलीचा खून

जितेंद्र जाधव, प्रतिनिधी

बारामती, 14 मे : महाराष्ट्रात याच महिन्यात ऑनर किलिंगच्या 2 घटना समोर आल्या असताना आता बारामतीमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीच्या आईने तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

बारामती शहरातील प्रगती नगर इथे हा प्रकार घडला आहे. ऋतुजा हरिदास बोबाटे (वय 19) असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. तर संजीवनी हरीदास बोबाटे असं आरोपी आईचं नाव आहे. ऋतुजाने एका युवकाशी आंतरजातीय विवाह केला म्हणून तिच्या

आईने सापळा रचत तिची हत्या केली. या प्रकरणात मुलीचा पती सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रात पुन्हा 'सैराट', लग्नाआधीच वडील आणि भावाकडून मुलीच्या प्रियकराचा खून

Loading...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

ऋतुजाचं एका युवकाशी प्रेम प्रकरण होतं. पण तो आंतरजातीय असल्यामुळे त्यांच्या लग्नासाठी कुटुंबीयांनी परवाणगी दिली नाही. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन एका मंदिरात विवाह केला. याची माहिती मिळताच लग्नानंतर ऋतुजाला घरी आणलं गेलं. पण खोट्या प्रतिष्ठेसाठी आईने मंगळवारी सकाळच्या दरम्यान ऋतुजाच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. आयुष्याची कुठे नवीन सुरुवात होणार तोच ऋतुजाच्या घरच्यांकडून तिची हत्या करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे.

हेही वाचा : पुण्यात आणखी एक सैराट..प्रेमविवाह केल्याने तरुणीचा भाऊ आणि चुलत्याने झाडल्या गोळ्या

दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आता ऋतुजाच्या घरच्यांची कसून चौकशी होणार आहे. प्रेम करून आयुष्याची स्वप्न पाहिलेल्या मुलीसोबत लग्न केलं पण ती आता आपल्यासोबत नसल्याचा धक्का युवकाला बसला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून ऋतुजाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.


मुंबईतील ATMमध्ये तरुणीसमोर युवकाचं हस्तमैथुन, मुलीनेच शूट केला VIDEO 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 01:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...