ऑनर किलिंग..आंतरजातीय विवाह केला म्हणून आई-वडिलांनी केली पोटच्या मुलीची हत्या

विवाहानंतर प्रतिभा 23 एप्रिलला माहेरी गेली होती. दरम्यान, प्रतिभाने आंतरजातीय विवाह केल्याचा राग त्यांच्या मनात होता. आई-वडिलांनी बुधवारी (ता. 24) मध्यरात्री दीड वाजेच्या प्रतिभाची निर्घृण केली.

News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2019 01:43 PM IST

ऑनर किलिंग..आंतरजातीय विवाह केला म्हणून आई-वडिलांनी केली पोटच्या मुलीची हत्या

अहमदनगर, 27 एप्रिल- आंतरजातीय विवाह केला म्हणून जन्मदात्यांनीच पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत विवाहीतेच्या पती देवेंद्र प्रकाश कोठावले (रा. गोल्डन सिटी, संगमनेर) याने सोनई पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी आई-वडिलांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रतिभा देवेंद्र कोठावले (वय-24) हे मृत विवाहितेचे नाव आहे. ब्रह्मदेव रमाजी मरकड (वडील), आशा ब्रह्मदेव मरकड (आई) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींवर खून करून पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

प्रतिभा आणि देवेंद्रने आंतरजातीय विवाह केला होता. या विवाहाला प्रतिभा कुटुंबीयांचा विरोध होता. विवाहानंतर प्रतिभा 23 एप्रिलला माहेरी (कौठा, ता.नेवासा) गेली होती. दरम्यान, प्रतिभाने आंतरजातीय विवाह केल्याचा राग त्यांच्या मनात होता. आई-वडिलांनी बुधवारी (ता. 24) मध्यरात्री दीड वाजेच्या प्रतिभाची निर्घृण केली. प्रतिभाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव केला. एवढेच नाही तर मृत्यूनंतर घरासमोरच प्रतिभाचा अंत्यविधी करुन पुरावा नष्ट केला. त्यामुळे मृतदेहाची उत्तरीय तपासणी होऊ शकली नाही, असा आरोप देवेंद्रने केला आहे.

देवेंद्रने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी प्रतिभात्या हत्येप्रकरणी तिच्या आई-वडिलांविरुद्ध हत्या करुन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading...


...म्हणून भर रस्त्यात महिलेनं तरुणाला चपलेनं बडवलं, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 01:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...