S M L

तुम्हाला माहितीये का, या आधीही राज्यातला शेतकरी संपावर गेला होता!

जगाच्या इतिहासामध्ये सहा वर्षे सुरू असलेला शेतकऱ्यांचा हा एकमेव संप.

Samruddha Bhambure | Updated On: Jun 1, 2017 02:23 PM IST

तुम्हाला माहितीये का, या आधीही राज्यातला शेतकरी संपावर गेला होता!

01 जून : राज्यात आजपासून शेतकरी संपावर गेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, देशातल्या शेतकऱ्यांचा हा काही पहिला संप नाही. स्वातंत्रपूर्व काळात रायगडच्या चरी कोपरीमध्ये देशातील पहिला शेतकऱ्यांचा संप झाला होता.  जगाच्या इतिहासामध्ये 7 वर्षे सुरू असलेला शेतकऱ्यांचा हा एकमेव संप.

स्‍वातंत्रयपूर्व काळात,  रायगड जिल्‍हयात अलिबाग तालुक्‍यातील चरी कोपर गावात पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा मेळावा भरला होता. खोती पदधतीमुळे कोकणातील शेतकरी गांजले होते . कुळांनी जमीन कसायची आणि 75 टक्के वाटा सावकारांना द्यायचा ही अन्यायकारक पद्धत इथं सुरू होती. एक प्रकारची वेठबिगारीच होती. कोकणातील खोतीविरूदध लढयाचे रणशिंग याच मेळाव्‍यात फुंकले गेले. शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली हजारो शेतकरयांनी संप पुकारला.

देशातील शेतकऱ्यांचा हा पहिला संप होता. शेतीवर उदरनिर्वाह असलेल्या कुळांनी शेतीच न करण्याचा निर्णय घेतला. तब्‍बल 7 वर्षे चाललेल्‍या या संपाचे नेतृत्‍व नारायण नागू पाटील यांनी केले तर शेतकरयांना न्‍याय मिळवून देण्‍यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म‍हत्‍वाची भूमिका बजावली होती. त्या संपाच्या इतिहासावर एक नजर टाकूया...'चरी कोपर'च्या शेतकऱ्यांच्या संपाचा इतिहास:

27 ऑक्टोबर 1933 रोजी चरी कोपर गावात पुकारला संप

संपामध्ये रायगड जिल्ह्यातील 25 गावांचा सहभाग होता

Loading...

सावकाराच्या जाचक खोत पद्धतीविरोधात उठवला आवाज

जमीन कुळांनी कसायची आणि सावकार 75 टक्के वाटा घ्यायचे !

कोकणातील खोत पद्धतीला विरोध करण्यासाठी पुकारला लढा

शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी लढ्याचं नेतृत्व केलं

संपाच्या काळात कुळांनी जमीन कसायची सोडून दिली

तब्बल 7 वर्षे हा शेतकरी लढा चालला

संपाच्या काळात अनेक कुटुंबांची वाताहत

शेतकऱ्यांना न्याय देण्यात डॉ.आंबेडकरांची महत्वाची भूमिका

तत्कालीन महसूलमंत्री मोरारजी देसाई यांनी संपकऱ्यांची भेट घेतली

जमिनी कुळांच्या नावावर झाल्यानंतरच अखेर 1939 साली संप मिटला

या प्रदीर्घ लढ्यानंतरच 'कूळ कायदा' अस्तित्वात आला

या लढ्यामुळेच कुळांना हक्काच्या जमिनी मिळाल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2017 01:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close