माऊलींच्या पालखीतला 'हिरा' निखळला!

आठ वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या हिरा नामक अश्वाचे निधन

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2018 05:49 PM IST

माऊलींच्या पालखीतला 'हिरा' निखळला!

पुणे, ता. 8 जलै : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रविवारी सकाळी हिरा नामक अश्वाचं निधन झालं. माऊलींच्या पालखीत तो गेल्या आठ वर्षांपासून अविरत सेवा देत होता.

बेळगांव जिल्ह्यीतील अंकली या गावातील श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांचा हा अश्व. आळंदी येथून माऊलींच्या पालखीने प्रस्थान झाले, त्या दिवशीपासूनच तो पालखीमध्ये सहभागी झाला होता. आळंदी ते पुणे या ३० किलोमीटरच्या वाटचालीत हिराने प्रामाणिकपणे माऊलीची सेवा पार पाडली.

ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ- संभाजी भिडे

शनिवारी माऊलींच्या पालखीसोबत हिरा सुद्धा पुण्यात दाखल झाला होता. रविवारी सकाळी ७ वाजता हिरा ने अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी तो अवघा बारा ते तेरा वर्षांचा होता. शनिवारपासूनच हिराची प्रकृती खालावली होती असं सांगण्यात येतंय. या दु:खद घटनेनंतर हिरा माऊलींच्या चरणी लीन झाला, अशी प्रतिक्रिया भाविकांनी न्यूज18 लोकमतकडे व्यक्त केली.

राईनपाडा हत्याकांड : तिसरा मारेकरी जंगलात लपून बसला होता,पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Loading...

पालखी सोहळ्यादरम्यान हिराचे असे अचानक जाणे, ही बाब सर्व भाविक-भक्तांच्या मनाला चटका लावून जाणारी ठरली आहे. माऊलीच्या चरणी लीन झालेल्या हिरावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील वाटचालीसाठी उर्जितसिंह शितोळे सरकार यांनी पर्यायी व्यवस्था केली असून, यापुढे राजा नावाचा अश्‍व माऊलींच्या पालखीत सेवा देणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2018 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...