S M L

हिंजवडीत लेबर कॅम्पचा छज्जा कोसळून एकाचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

अजब लाल नावाचा मजूर यामध्ये मृत्यूमुखी पडला आहे. 10-15 फुटावरून पडल्याने, लोखंडी जिना असल्याने जखमी झाले. 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर इतरांना मुक्का मार, तोंडाला ,चेहऱ्याला जखमा झाल्या आहेत.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 25, 2017 10:48 AM IST

हिंजवडीत लेबर कॅम्पचा छज्जा कोसळून एकाचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

पुणे,25 सप्टेंबर: हिंजवडीच्या राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज3 मध्ये एक लेबर कॅम्प आहे.  या लेबर कॅम्पमधील छज्जा कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

राजीव गांधी इन्फोटेक फेज 3मध्ये आयएनडब्लयू कंपनीचा लेबर कॅम्प आहे. या कॅम्पमध्ये 1000 कामगार राहतात. हिंजवडी परिसरात कंपनीची 2 कामं सुरू आहेत, तिथं हे मजूर काम करतात. येथे रविवारी रात्री 2 कामगारांमध्ये भांडण झालं. भांडण वाढून वादावादी आणि शिवीगाळ वाढली. दरम्यान पहिल्या माळ्यावरचे 40 ते 50 जण बघायला धावले. लोखंडी जिना, छज्जा यावर एकदम 40,50 लोक उभे राहिल्याने तो कोसळला. अजब लाल नावाचा मजूर यामध्ये मृत्यूमुखी पडला आहे. 10-15 फुटावरून पडल्याने, लोखंडी जिना असल्याने जखमी झाले. 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर इतरांना मुक्का मार, तोंडाला ,चेहऱ्याला जखमा झाल्या आहेत.

हिंजवडी हॉस्पिटल आणि लाईफ पॉईंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हे सगळे मजूर उत्तर प्रदेश, बिहार, परराज्यातील आहेत. हिंजवडी पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

काही कळण्या अगोदर सर्व घडलं आणि तो अशा पद्धतीने जखमी झाला, तर दुसरीकडे हे लेबर कैंप माणसांना राहण्यासाठी अजिबात योग्य नसल्याची तक्रार एका जखमी कामागारने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close