S M L

धावत्या दुचाकीवर बसलेल्या महिलेला आली चक्कर, तरुणाने वाचवले प्राण

वृद्ध महिलेला चक्कर आल्याने चालत्या दुचाकी वरुन पडत असतांना एका पादचारी व्यक्तीनं तिला झेललं आणि तिचा जीव वाचवलाय

Sachin Salve | Updated On: Feb 14, 2018 09:43 PM IST

धावत्या दुचाकीवर बसलेल्या महिलेला आली चक्कर, तरुणाने वाचवले प्राण

14 फेब्रुवारी : वृद्ध महिलेला चक्कर आल्याने चालत्या दुचाकी वरुन पडत असतांना एका पादचारी व्यक्तीनं तिला झेललं आणि तिचा जीव वाचवलाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये.

ही घटना हिंगोली जिल्हातील सेनगाव तालुक्यातल्या गोरेगाव इथं घडलीये. गोरेगाव येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या माऊली टेडर्स दुकानातील नोकर रामेश्वर खिल्लारी हे पिण्याचे पाणी आणण्यासाठी जात होते. तेव्हा समोरुन येत असलेल्या दुचाकीवर मागे बसलेली महिला पडत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी दुचाकी चालकास हात दाखवत दुचाकी उभी करण्यासाठी इशारा केला.

त्यानंतर चालकाने ब्रेक मारला मात्र दुचाकी थांबे पर्यंत मागे  बसलेली महिला दुचाकीवरुन खाली कोसळणार तोच रामेश्वर यांनी प्रसंगावधान राखत या महिलेस अलगत हातावर झेललं. रामेश्वर ने दाखवलेल्या तत्परतेमुळे अपघाताचा अनर्थ टळल्याचा व्हिडिओ दुकानासमोरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. रामेश्वर यांनी केलेल्या कार्याचे गावात कौतुक होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 09:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close