गडचिरोली माओवादी हल्ला: आई-वडील, 4 बहिणी, पत्नी आणि 2 मुलांचं सुखी कुटुंब झालं पोरकं

कन्हैया खंडेलवाल, 01 मे: महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात 15 जवान शहीद झाले तर एका खासगी वाहन चालकाचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात 15 जवान आणि एक चालक शहीद झाले. माओवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे. जांभूरपाडा गावाजवळील ही घटना आहे.

हा हल्ल्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राम्हणवाडा तांडा गावातील एक जवान शहीद झाला आहे.

संतोष देविदास चव्हाण असं शहीद जवानाचं नाव आहे. 2011ला संतोष हे गडचिरोलीच्या सैनिक भरतीमध्ये कामाला रुजू झाले होते. त्यांच्या नोकरीला 8 वर्ष पूर्ण झाली आहेत.

शहीद जवान संतोष चव्हाण यांच्या पश्चात घरी आई-वडील, 4 बहिणी, पत्नी आणि 2 मुलं असं कुटुंब आहे. संतोष यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

औंढा तालुक्यासह ब्राह्मणवाडा तांड्यावर संतोष यांच्या जाण्यामुळे शोककळा पसरली आहे. माझा मुलगा अगदी मनमिळावू स्वभावाचा असल्याचं त्यांच्या आई म्हणतात.

कुरखेडा तालुक्यात जांभूरखेडा गावाजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात 15 जवान शहीद झाल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'नेटवर्क 18 लोकमत'शी संवाद साधताना दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या माहितीला दुजोरा दिला आहे. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

गस्तीवरील जवानांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या या माओवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटाचं लक्ष्य ठरल्या. त्यातून 25 जवान प्रवास करत होते. त्यातल्या 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि इतर जखमी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: hingoli
First Published: May 1, 2019 07:53 PM IST

ताज्या बातम्या