S M L

सकाळी वडिलांचं निधन, पुजा 11 वाजता परीक्षा केंद्रावर हजर !

आयुष्यात खचणाऱ्यासाठी हिंगोली येथील पुजाने आदर्श निर्माण केला आहे. सकाळी वडिलांचे निधन झाले पण तरीही पुजा परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचली होती.

Sachin Salve | Updated On: Mar 2, 2018 12:06 AM IST

सकाळी वडिलांचं निधन, पुजा 11 वाजता परीक्षा केंद्रावर हजर !

01 मार्च : आयुष्यात कितीही संकट आली तरी त्या संकटांना धैर्याने सामना करुण पुढे जायचे असते. आयुष्यात खचणाऱ्यासाठी हिंगोली येथील पुजा हनवतेने आदर्श निर्माण केला आहे. सकाळी वडिलांचे निधन झाले पण तरीही पुजा परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचली होती.

पुजा हनवतेचे वडील चम्पति हनवते यांचे आज सकाळीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुःखाचा डोंगर कोसळला तरी पुजा काळजावर दगड ठेऊन दहावीची परीक्षा द्यायला आली. एकीकडे हात पाय दुखले तरी पेपर देण्याचे टाळणारे विद्यार्थी आहेत. पेपर अवघड गेला,अभ्यास नाही झाला तर जीवाच बर वाईट करणारे विद्यार्थी आहेत तर दुसरीकडे वडिलांचा शव घरी सोडून परीक्षा द्यायला येणारी पुजा आहे.

पुजा हनवते लोहगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेते . आपल्या विद्यार्थिनीच्या वडिलांचे निधन झाले आहे तिचा वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुजा शिकत असलेल्या आदिवासी आश्रमशाळेच्या शिक्षकांनी पूजा च्या घरी जाऊन तिला धीर देऊन पेपर देण्यासाठी प्रोत्साहन दिले.

वडिलांचे निधन झाल्यानंतर सुद्धा आयुष्यात न थांबता पुजा ने दहावीचे पेपर देऊन आपल्या सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. संकटाला न घाबरता पुजा ने दाखवून दिल आहे की शो मस्ट गो ऑन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2018 12:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close