S M L

पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले म्हणून व्हिडिओ रेकाॅर्ड करून केली आत्महत्या

दिलीप पवारच्या आई-वडील आणि नातेवाईकांवर तूर चोरल्याचा खोटा गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली असा आरोप या क्लिपमध्ये करण्यात आलाय.

Sachin Salve | Updated On: Jan 8, 2018 11:40 PM IST

पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले म्हणून व्हिडिओ रेकाॅर्ड करून केली आत्महत्या

हिंगोली,08 जानेवारी : पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात आईला अटक केली म्हणून हिंगोली जिह्यात दिलीप पवार या व्यक्तीनं आत्महत्या केलीय. यातली धक्कादाय बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी दिलीप पवारनं त्याची एक क्लिप बनवलीय. त्यात त्यानं आपण आत्महत्या का करतोय हे मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंय.

दिलीप पवारच्या आई-वडील आणि नातेवाईकांवर तूर चोरल्याचा खोटा गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली असा आरोप या क्लिपमध्ये करण्यात आलाय.

दिलीपनं आधी विषारी औषध प्राशन केलं. त्यानंतर त्यानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या क्लिपमध्ये बासंबा पोलीस आणि डीवायएसपींसह काही जणांनी धमकी दिल्याचाही आरोप केलाय.

दरम्यान, या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात 11 जणांवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी दोषी पोलिसांवरही कारवाईची कुटुंबियांनी मागणी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2018 11:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close