News18 Lokmat

शिवसैनिकांचा गोंधळ, नेत्याचीच बैठक उधळून लावली

संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 10:07 PM IST

शिवसैनिकांचा गोंधळ, नेत्याचीच बैठक उधळून लावली

हिंगोली, 25 मार्च : हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला आहे. जयप्रकाश मुंदड़ा यांना जातीच्या आधारावरून उमेदवारी नाकारल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

लोकसभा उमेदवारी मराठा समाजाला दिली तर शिवसेना जिल्हाप्रमुख पण मराठा समाजाचा द्या, अशी मागणीच आता शिवसेना कार्यकर्त्यांनी केली आहे. या गोंधळानंतर शिवसैनिकांनी ही बैठक उधळून लावली आहे. या सगळ्या प्रकारानंतर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

दरम्यान, उस्मानाबाद शिवसेनेतही नाराजी असल्याची पाहायला मिळालं. तिकीट नाकारल्याने उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांनी मुंबईत धडक दिली होती. त्यानंतर काही गाड्या भरून त्यांचे कार्यकर्ते मुंबईत आले होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी नको म्हणून मातोश्रीवरून त्यांची दखल घेण्यात आली आणि गायकवाड आणि सहकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं.

रवींद्र गायकवाड मातोश्रीवर दाखल झाले. तर शनिवारपासून गायकवाड समर्थक कार्यकर्ते मुंबईतच ठाण मांडून बसले होते. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं तिकीट कापल्यानंतर गायकवाड आणि त्यांचे समर्थक नाराज कमालीचे नाराज आहेत.


Loading...

राहुलचा मास्टर स्ट्रोक, काँग्रेस अध्यक्षांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 10:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...