"राम मंदिरासाठीचा माझा गुप्त प्रयत्न हिंदू किंवा मुस्लिम नेत्यांनी फोडला"

"अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी कोर्टाबाहेर काही तडजोडी व्हाव्यात यासाठी मी गेले सहा महिने गुप्तपणे प्रयत्न करतोय"

  • Share this:

17 नोव्हेंबर : अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी कोर्टाबाहेर काही तडजोडी व्हाव्यात यासाठी मी गेले सहा महिने गुप्तपणे प्रयत्न करतोय पण हिंदू किंवा मुस्लिम समाजातील नेत्यांनी माझा हा प्रयत्न प्रसारमाध्यमात जाहीर केल्याचा आरोप आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केलाय.

अयोध्येत राम मंदिर निर्मितीच्या चर्चेसाठी आधात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतलाय. अयोध्येत जाऊन श्री श्रींनी दोन्ही गटांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आज श्री श्री रवीशंकर यांचे नागपुरात तीन दिवसाच्या अंतरंग वार्ता या कार्यक्रमासाठी आगमन झाले. श्री श्री रविशंकर  हे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांचीही भेट घेणार आहे.

आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना, अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी कोर्टाबाहेर सर्व पक्षांची सहमती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं श्री श्री रविशंकर यांनी सांगितलं.

तसंच अयोद्धेत राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायायलाने दिलेला निकाल सर्वांना मानावा लागेल पण पन्नास शंभर वर्षानंतर लोकाच्या मनांत असा विचार येऊ शकतो की कोर्टाच्या निर्णयाने आमच्यावर अन्याय झाला. त्यामुळे हा प्रश्न कोर्टाबाहेर तडजोडीतून सोडवला गेला पाहिजे या मतावर मी आलो असल्याचं श्री श्री रविशंकर म्हणाले.

दरम्यान, रामलला अर्थात प्रभु राम चौदा वर्ष वनवासात होते पण आता तर ते गेल्या २५ वर्षांपासून टेंटमध्ये असल्यामुळे दु:ख होतं असल्याचंही श्री श्री रविशंकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 10:27 PM IST

ताज्या बातम्या