हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अनेक पाकिस्तानी मल्लांना धूर चारली

  • Share this:

पुणे, १७ सप्टेंबर- हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. आंदळकर यांना सायंकाळी सातच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयामध्ये उपचारा दरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर सोमवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या मुळगावी पुनवत येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. आंदळकर यांनी कुस्तीमध्ये राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान कामगिरी बजावली. त्यांनी १९६० मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली. नामवंत मल्लाबरोबरीच्या त्यांच्या अनेक लढती गाजल्या.

कोल्हापुर जिल्ह्यातील पुनवत गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले गणपतराव आंदळकर १९५० मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरची ओळख कुस्तीपंढरी अशी निर्माण केली होती. देशभरातील मल्ल इथे कुस्तीसाठी येत होते. दरबारातील मल्ल बाबासाहेब वीर हे त्यांना वस्ताद म्हणून लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते कुस्ती करू लागले. त्याचमुळे कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टचा शाहू पुरस्कार जाहीर झाला तेव्हा अर्जुन पुरस्कारापेक्षा अधिक आनंद झाल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. १९६४ मध्ये भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. आंदळकरांच्या उमेदीचा काळ हे कुस्तीचे सुवर्णयुग होते. कुस्तीला प्रतिष्ठा होती आणि मल्लांना ग्लॅमर होते.

आंदळकर यांनी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय देदीप्यमान कामगिरी बजावली. त्यांनी १९६० मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली. पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसिर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लिलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनिफ, श्रीरंग जाधव या नामवंत मल्लाबरोबरीच्या त्यांच्या लढती गाजल्या होत्या. १९६२ मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियायी स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले. १९६४ मध्ये टोकिओ ऑलिपिंकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व आंदळकर यांनी केले. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती.

महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल १९८२ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले आहे. कोणत्याही मल्लाची कारकीर्द खूप कमी असते. उमेदीच्या अल्पशा कालावधीत विजेसारखे चमकून दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहावे लागते. कुस्ती सोडल्यानंतर बहुतेक मल्ल आपल्या पारंपरिक व्यवसायात गुंतून जातात. गणपतराव आंदळकर यांनी मात्र लाल मातीची संगत सोडली नाही. १९६७ पासून मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक मल्ल घडवले. त्यात महान भारत केसरी रूस्तम-ए- हिंद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, अ‍ॅग्नेल निग्रो, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, संभाजी वरुटे, राष्ट्रकुल सुवर्णपद विजेता रामचंद्र सारंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ही मल्लांची नामावलीवरून त्यांच्या वस्तादगिरीची कल्पना येऊ शकते.

आंदळकर यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय देदीप्यमान कामगिरी बजावली. त्यांनी १९६० मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली. पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसिर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लिलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनिफ, श्रीरंग जाधव या नामवंत मल्लाबरोबरीच्या त्यांच्या लढती गाजल्या होत्या. १९६२ मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियायी स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले. १९६४ मध्ये टोकिओ ऑलि​पिंकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व आंदळकर यांनी केले. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल १९८२ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले आहे. कोणत्याही मल्लाची कारकीर्द खूप कमी असते. उमेदीच्या अल्पशा कालावधीत विजेसारखे चमकून दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहावे लागते.

कुस्ती सोडल्यानंतर बहुतेक मल्ल आपल्या पारंपरिक व्यवसायात गुंतून जातात. गणपतराव आंदळकर यांनी मात्र लाल मातीची संगत सोडली नाही. १९६७ पासून मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक मल्ल घडवले. त्यात महान भारत केसरी रूस्तम-ए- हिंद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, अॅग्नेल निग्रो, महाराष्ट्र केसरी विष्णू जो​शीलकर, संभाजी वरुटे, राष्ट्रकुल सुवर्णपद​ विजेता रामचंद्र सारंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ही मल्लांची नामावलीवरून त्यांच्या वस्तादगिरीची कल्पना येऊ शकते.

'विराटने लग्नाचे 300 कोटी भारतात खर्च केले असते तर लोकांना मिळालं असतं काम'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2018 08:00 AM IST

ताज्या बातम्या