S M L

VIDEO : 'मला तिथे माझा मृत्यू समोर दिसत होता'

Updated On: Aug 5, 2018 10:59 PM IST

VIDEO : 'मला तिथे माझा मृत्यू समोर दिसत होता'

धुळे, 05 आॅगस्ट : आमचे काही कार्यकर्ते तिथे होते त्यांनी मला बाहेर खेचून काढलं. मी बाहेर पडल्यानंतर त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मला तिथे माझा मृत्यू समोर दिसत होता. आंदोलन अनेक प्रकारचे होतात पण एखाद्या महिला लोकप्रतिनिधींच्या गाडीवर असा हल्ला होत असेल तर हे निंदणीय आहे अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार हिना गावित यांनी दिली.

धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांना आज मराठा आंदोलनकांच्या रोषाचा सामना करावा लागला. धुळ्यातील नियोजन मंडळाच्या बैठकीत भुसे यांच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. तसंच खासदार हिना गावित यांची गाडीही आंदोलकांनी फोडल्याचं समोर आलं आहे. गाडीच्या काचा फोडून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. खासदार हिना गाडीत असतानाच ही तोडफोड करण्यात आली.

आंदोलकांनी गाडीवर चढत गाडीची तोडफोड केली. खासदार गावित यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पण या घटनेमुळे खासदार हिना गावित यांना धक्का बसलाय. आमचे काही कार्यकर्ते तिथे होते त्यामुळे त्यांनी मला बाहेर खेचून काढलं आणि मला बाजूला घेतलं. पण तरीही आंदोलकांचा राडा सुरूच होता. त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मला तिथे माझा मृत्यू समोर दिसत होता. आंदोलन अनेक प्रकारचे होतात पण एखाद्या महिला लोकप्रतिनिधींच्या गाडीवर असा हल्ला होत असेल तर हे निंदणीय आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

गाडीवर हल्ला करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोळा दिवस चालेल्या आंदोलनाची दखल न घेतल्याने, राग व्यक्त करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी पोलिसांकडून सौम्य लाढीचार्जही करण्यात आला.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कारवाई नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करणार, सर्वांचे हित जपूनच मेगाभरती करणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच लोकशाहीने अनेक मार्ग आंदोलनासाठी दिले आहेत. त्यात हिंसेला स्थान नाही. हिंसेमुळे आंदोलन, विचार, संघर्ष बदनाम होतो. कोवळी तरूणाई आत्महत्या करते, यामुळे मनाला अतिशय वेदना होतात त्यामुळे आत्महत्या करू नका चर्चेला या मी तुमच्यासाठी एक पाऊल मागे घ्यायला तयार आहे असं आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.

Loading...
Loading...

तसंच संवेदनशील नेत्यांनी नेतृत्त्व करणे सोडले तर संपूर्ण समाज दिशाहिन होईल. मार्ग संवादातून निघणे शक्य. सरकार संवादासाठी सदैव तयार, कटिबद्ध आहे. हा प्रश्न राजकारणात अडकविण्याचा नाही, प्रतिस्पर्धेसाठी वापरण्याचा नाही. असे झाले तर महाराष्ट्र आपल्याला कधीही माफ करणार नाही. आता राजकीय कुरघोडी करण्याऐवजी या व्यवस्थेचे एक घटक म्हणून एकत्रित येऊन या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. हे आवाहन गांभीर्याने घेऊन, संवादाची प्रक्रिया पुढे नेली पाहिजे असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांना केलं.

तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, मराठा आरक्षणाकडे मागील सरकारने आणि या सरकारनेही दुर्लक्ष केलंय. पण आता काहीतरी मार्ग काढा नाहीतर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. लोक ऐकण्याच्या मनस्थितीत राहिली नाहीत, अजूनही जर तुम्हाला अंत बघायचा असेल तर बघा काही घडलं तर मग याला न्यायव्यवस्था, प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार असतील अशा इशारा साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलाय. तसंच राज्य सरकारने मराठा तरुण हा माओवादी होण्याची वाटू पाहु नये असाही इशारा दिला.

हेही वाचा..

मराठा आरक्षणावर काय बोलले मुख्यमंत्री? वाचा 20 ठळक मुद्दे

VIDEO: मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावित यांची गाडी फोडली

खडसेंना पंतप्रधानही व्हावंसं वाटेल,गिरीश महाजनांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2018 10:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close