हिमांशू रॉय यांची आत्महत्या, आजाराला कंटाळून सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने झाडली गोळी

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज आत्महत्या केली. या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: May 11, 2018 06:16 PM IST

हिमांशू रॉय यांची आत्महत्या, आजाराला कंटाळून सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने झाडली गोळी

मुंबई,ता.11,मे: राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज आत्महत्या केली. स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरे गोळी झाडून त्यांनी आपलं जीवन संपवलं. या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही काळापासून त्यांना  बोन कॅन्सरनं ग्रासलं होतं. या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. रॉय हे दक्षिण मुंबईत मंत्रालया जवळच्या सुनिती या इमारतीच्या चवथ्या माळ्यावर राहात होते.

दुपारी 1.40 च्या सुमारास ही घटना घडली. गोळीबाराचा आवाज ऐकल्याबरोबर त्यांच्या गाडीचा चालक त्यांच्या रूममध्ये गेले त्यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. चालकाने त्यांना लगेच कारनं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

पिळदार शरीरयष्टी आणि 6 फुटाच्या जवळपास असणारी उंची आणि रूबाबदार व्यक्तिमत्व यामुळं हिमांशू रॉय यांच्या व्यक्तिमत्वाची प्रत्येकावर छाप पडत असे. व्यायामाची त्यांना प्रचंड आवड होती. अनेक तास ते जिममध्ये घालवत होते. पिळदार शरीर होण्यासाठी त्यांना स्टिरॉईड्सची सवय लागली आणि त्यानेच त्यांचा घात गेला अशीही माहिती आहे. सुरवातीला त्यांना हाडाचा कॅन्सर झाला आणि नंतर रक्ताचा कॅन्सर यामुळं त्यांना सातत्यानं त्रासदायक उपचारांना समोरं जावं लागत होतं. याचा त्यांना कंटाळा आला होता.

हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण, मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, 2013 मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. तसंच, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान डबल मर्डर केस अशी अनेक महत्त्वाच्या हय प्रोफाईल प्रकरण सोडविण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती. गेल्या सहा महिन्यांपासून ते रजेवर होते. उपचारासाठी त्यांनी रजा घेतली होती.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2018 02:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...